घरक्राइमशीख नेते रिपुदमन यांची निर्घृण हत्या; कनिष्क बॉम्बप्रकरणात समोर आलं होत नाव

शीख नेते रिपुदमन यांची निर्घृण हत्या; कनिष्क बॉम्बप्रकरणात समोर आलं होत नाव

Subscribe

कॅनडाचे शीख नेते आणि पंजाबी वंशाचे व्यापारी रिपुदमन सिंग मलिक यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना कॅनडातील सरे येथे गुरुवारी रात्री उशारा घडली. कारमधून जात असताना काही अज्ञात दुचाकी चालकांनी त्यांची कार रोखून फायरिंग केली. यात रिपुदमन मलिक यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी नंतर त्यांची कार पेटवून दिली आहे. मात्र हत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

1985 च्या कनिष्क बॉम्बस्फोट प्रकरणात रिपुदमन सिंग मलिक यांचे नाव समोर आले होते. मात्र 2005 मध्ये त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. मात्र गुरुवारी रात्री कॅनडातील सरे शहरातील 128 अँड 82 चौकात त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकरी कारमधून आले होते. यावेळी काही अंतरावर कार पार्क केली आणि नंतर दुचाकीवरून ते पुढे आले. हत्या केल्यानंतर आरोपींनी कार पेटवून दिली. पुरावे नष्ट करण्यासाठी कारला आग लावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

रिपुदमन सिंग हे कॅनडाचे यशस्वी उद्योजक तसेच शीख संघटनांचे प्रतिनिधी होते. 1985 मध्ये एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करून त्यात स्फोट घडवल्याचा आरोप त्याच्यावर होता. मॉन्ट्रियलहून नवी दिल्लीला येणाऱ्या विमानात हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. या दुर्घटनेत 329 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात रिपुदमन सिंग 2005 पर्यंत कॅनडात तुरुंगात होते आणि नंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. रिपुदमन सिंग हे आधी खलिस्तानचे समर्थक होते पण नंतर त्यांची विचारधारा बदलली. शेवटच्या क्षणापर्यंत ते शीख समाजातील लोकांना फुटीरतावादी नेत्यांपासून दूर राहण्याची प्रेरणा देत राहिले.

रिपुदमन सिंग यांची हत्या कट्टरवाद्यांनी केल्याचा संशय आहे. खलिस्तानच्या विचारसरणीपासून दूर जाऊन ते कॅनडातील धर्मांधांना भारत सरकारच्या दिशेने जागृत करत होता, असे सांगितले जात आहे. रिपुदमन सिंग मलिक श्रीगुरू ग्रंथ साहिब छापून प्रसिद्धीच्या झोतात आले.

- Advertisement -

रिपुदमन सिंग मलिक हे भारतीय पंतप्रधान मोदींचे मोठे प्रशंसक होते आणि त्यांनी शीख समुदायासाठी मोदी सरकारने उचललेल्या अनेक अभूतपूर्व सकारात्मक पावलांसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र लिहिले. खालसा क्रेडिट युनियन, खालसा स्कूल कॅनडाचे संस्थापक, रिपुदमन सिंग मलिक यांनी अलीकडेच पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात, वर्तमान भारत सरकार शिखांसाठी करत असलेल्या सकारात्मक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. निर्दोष सुटल्यानंतरही रिपुदमन सिंग काळ्या यादीत होते, पण मोदी सरकारने काळी यादी रद्द केल्यावर रिपुदमन सिंग भारत दौऱ्यावर आले.


आजपासून देशात मोफत बुस्टर डोस देण्यास सुरुवात, सर्व प्रौढांना 75 दिवसांत मिळणार लस


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -