Today Gold Silver Price: आज सोन्यासह चांदीचे दर वाढले, जाणून घ्या आजची किंमत

silver gold price today 2 November 2020 latest price gold mcx price rise above rs 50760 ahead of us polls
Today Gold Silver Price: आज सोन्यासह चांदीचे दर वाढले, जाणून घ्या आजची किंमत

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची उद्या निवडणूक आहे, यामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा दर ०.१२ टक्के म्हणजे ६१ रुपयांनी वाढून ५० हजार ७६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा दर १.१२ टक्के म्हणजेच ६८२ रुपयांनी वाढू ६१ हजार ५४७ रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.

जागतिक स्तरावर मजबूत डॉलरमुळे सोन्याची घसरण झाली आहे. उद्या (मंगळवारी) होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची गुंतवणूकदारांची प्रतीक्षा आहे. जागतिक पातळीवर सोन्याचे दर ०.२ टक्क्यांनी घसरुन १,८७३.८७ डॉलर प्रति औंसवर बंद झाले.

अमेरिकेतील सोन्याचे दर ०.३ टक्क्यांनी घसरुन ते १,८७५.०० डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. डॉलर निर्देशांकात ०.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अन्य धातुमध्ये चांदीचे दर ०.९ टक्क्यांनी घसरुन २३.४१ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. तर प्लॅटिनमचे दर १.५ टक्क्यांनी घसरुन ८३६.३७ डॉलर आणि पॅलिडियमचे दर ०.२ टक्क्यांनी वाढून २,२१६.०५ डॉलर गेली आहे. जागतिक स्तराच्या अनुषंगाने भारतात सोन्याच्या किंमती यंदा २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सणाच्या हंगामात भारतात सोन्याची मागणी वाढेल, अशी विश्लेषकांचे मत आहे.


हेही वाचा – कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर WHOचे महासंचालक क्वारंटाईन!