घरक्रीडाफ्रेंच ओपनच्या महिला एकेरीत सिमोना हालेप विजयी

फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीत सिमोना हालेप विजयी

Subscribe

सिमोना हालेपच्या पदरात पहिले ग्रॅण्ड स्लॅम

फ्रेंच ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीतील अंतिम सामन्यात रोमानियाची सिमोना हालेप विजयी ठरली आहे. अमेरिकेची टेनिसपटू स्लोन स्टिफन्सला नमवत तिने विजय मिळवला. सिमोनाने आपल्या कारकिर्दीतले पहिले ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद जिंकले. गेल्या ४० वर्षांत ग्रँड स्लॅम मिळवणारी सिमोना हालेप ही रोमानियाची पहिली खेळाडू ठरली आहे.

सिमोना हालेपचा तीन सेट्स मध्ये विजय

तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन फायनलमध्ये उतरलेल्या सिमोना हालेपने अमेरिकेची टेनिसपटू स्लोन स्टिफन्सला तीन सेट्स मध्ये धुळ चारत विजय मिळवला. २ तास ३ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिमोना हालेपने स्लोन स्टिफन्सला ३-६, ६-४, ६-१ अशा सेटमध्ये हरवले. ४० वर्षांत ग्रँड स्लॅम मिळवणारी सिमोना हालेप ही रोमानियाची पहिली खेळाडू ठरली आहे.
सिमोना हालेपने २०१४ आणि २०१७ साली देखील फ्रेंच ओपन स्पर्धेत फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र तिला फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला. तर याच वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्येही हालेपला डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावर्षी मात्र सिमोना हालेपने स्पेनच्या गारबाइन मुगुरुजाचा ६-१, ६-४ ने पराभव करत फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आज सिमोनाने आपल्या कारकिर्दीतले पहिले ग्रँड स्लॅम जिंकले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -