घरताज्या घडामोडीMatrimonial Sites : लग्नसंस्थेवरील वधू- वराचा प्रोफाईल खरा की खोटा कसे ओळखाल?

Matrimonial Sites : लग्नसंस्थेवरील वधू- वराचा प्रोफाईल खरा की खोटा कसे ओळखाल?

Subscribe

आजच्या काळात एक चांगला जोडीदार शोधणं फारच कठीण झाले आहे.त्यामुळे कोणाच्यातरी ओळखीणे लग्न जुळवले जाते. मात्र हा सर्व खटाटोप करताना संपूर्ण वेळ वाया जातो. या सर्व गुंतागुंतीतून पर्याय म्हणून अनेकजण मॅट्रिमोनियल साइटकडे वळतात. हल्ली या लग्नसंस्थांचे जाळे दिवसेंदिवस फोफावत चालले आहे. या मॅट्रिमोनियल साइटवर अनेकजण आपली प्रोफाइल अपलोड करत असतात. मात्र बऱ्याचवेळा या साइटवर काही फेक प्रोफाइलदेखील असतात. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी चांगला जोडीदार शोधण्याच्या नादात काही फेक प्रोफाइलमुळे संकटांमध्ये अडकतात.

आजच्या काळात एक चांगला जोडीदार शोधणं फारच कठीण झाले आहे.त्यामुळे कोणाच्यातरी ओळखीणे लग्न जुळवले जाते. मात्र हा सर्व खटाटोप करताना संपूर्ण वेळ वाया जातो. या सर्व गुंतागुंतीतून पर्याय म्हणून अनेकजण मॅट्रिमोनियल साइटकडे वळतात. हल्ली या लग्नसंस्थांचे जाळे दिवसेंदिवस फोफावत चालले आहे. या मॅट्रिमोनियल साइटवर अनेकजण आपली प्रोफाइल अपलोड करत असतात. मात्र बऱ्याचवेळा या साइटवर काही फेक प्रोफाइलदेखील असतात. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी चांगला जोडीदार शोधण्याच्या नादात काही फेक प्रोफाइलमुळे संकटांमध्ये अडकतात. मात्र या लग्नसंस्थेवरील वधू किंवा वराचा प्रोफाइल खरा की खोटा हे ओळखणे फार गरजेचे आहे. कारण याआधी अशा काही घटना समोर आल्या आहेत की, या फेक प्रोफाइलवरुन भल्या मोठ्या रोख रकमेची मागणी केली जाते. मात्र या फेक प्रोफाईल पासून होणारे नुकसान होऊ नये याकरीता तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.

फोटोवरुन माणसाची पारख करा

कोणत्याही मॅट्रिमोनियल साइटवर प्रोफाइल बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला फोटो अपलोड करावा लागतो. त्यामुळे या मॅट्रिमोनियल आयडीसाठी फोटो आवश्यक आहे. त्यामुळे साइटवरील अशी कोणतीही प्रोफाइल पाहू नका की ज्यात,  फोटो अपलोड केलेला नाही. याशिवाय तुम्ही फोटो पाहून त्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज घेऊ शकता. मात्र, काही प्रोफाइलला प्रचंड एडिट केलेला फोटो लावण्यात येतो. त्यामुळे अशा प्रोफाइलपासून दूर रहा.

- Advertisement -

बेसिक माहितीच्याआधारे प्रोफाइल चेक करा

कोणत्याही मॅट्रिमोनियल साइटवर आयडी बनवण्यासाठी सुरुवातीला स्वत:ची बेसिक माहिती त्यात लिहावीच लागते. जर तुम्हाला कोणत्याही प्रोफाइलमध्ये बेसिक माहिती उपलब्ध नसेल तर, त्यावर संपर्क करणे धोकादायक ठरु शकते. याशिवाय ज्या प्रोफाइलमध्ये माहिती आहे त्याची खात्री करणे आवश्यक आहे.

सतत प्रोफाइल एडिट करणे

मॅट्रिमोनियल साइटवर अनेकदा काही लोक आपली प्रोफाइल सतत एडिट करत असतात. अशा लोकांच्या प्रोफाइलमध्ये सत्यता खूप कमी प्रमाणात असते.

- Advertisement -

पैसे मागणाऱ्यांपासून सावधान

जर प्रोफाइलवर तुमच्याकडे कोणा पैसे मागत असेल तर,सावधान रहा. कारण मॅट्रिमोनियल साइटवरुन मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत.


हे ही वाचा – ‘सलमान स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे’, हिंदी Bigg Boss 15 मधून बाहेर येताच बिचुकलेंचा संताप


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -