Singer KK Death: प्रसिद्ध गायक के के यांचे निधन, संगीत कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा झटका

के के 53 वर्षांचे होते. त्यांनी हिंदीत 200 हून अधिक गाणी गायली आहेत. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातही त्यांनी गाणी गायली आहेत.

Om Puri's wife demands CBI probe into KK's death
ओम पुरींच्या पत्नीने केकेच्या मृत्यूप्रकरणी केली सीबीआय चौकशीची मागणी

नवी दिल्लीः Krishnakumar Kunnath Died: प्रसिद्ध गायक केके यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. परफॉर्मन्सदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. के के 53 वर्षांचे होते. त्यांनी हिंदीत 200 हून अधिक गाणी गायली आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातही त्यांनी गाणी गायली आहेत.

कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये के.कें.चा कार्यक्रम होता, याची माहिती त्यांनी स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर दिली होती. अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्ता यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरमान म्हणाला की, केके सर आता नाहीत यावर आम्हाला विश्वास बसत नाही.

केकेंच्या आकस्मिक निधनानं सगळ्यांनाच धक्का बसलाय. ही बातमी रात्री उशिरा समोर समजताच संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. क्रीडा, मनोरंजनासह जगातील अनेक बड्या व्यक्ती सोशल मीडियावर शोक व्यक्त करीत आहेत. अभिनेता अक्षय कुमारनेही गायकाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

गायक केकेंचे पूर्ण नाव कृष्णकुमार कुननाथ आहे. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहेत, केके यांनी आपल्या आवाजात अनेक गाणी गायली आहेत. 23 ऑगस्ट 1970 रोजी जन्मलेल्या केकेंनी हिंदी व्यतिरिक्त मराठी, बंगाली, गुजराती, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि तमीळ गाण्यांना आवाज दिला. त्यांचा गोड आवाज सर्वांच्या मनाला भिडला.

केकेंनी दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. केकेंनी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वीच जवळपास 35000 जिंगल्स गायल्या होत्या. याशिवाय 1999 च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान त्यांनी भारतीय संघाच्या समर्थनार्थ ‘जोश ऑफ इंडिया’ हे गाणे गायले होते. नंतर केकेंनी ‘पल’ या म्युझिक अल्बममधून गायक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली आणि मागे वळून पाहिले नाही.

पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर केकेंनी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीही स्वीकारली. बॉलिवूडमध्ये येणे त्यांच्या नशिबात लिहिले असले तरी त्यांनी मधेच नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि मनोरंजन विश्वात नाव कमावले. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘तडप तडप’ गाण्याने केकेंना बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला. या गाण्यानंतर त्यांची गणना मोठ्या गायकांमध्ये होऊ लागली. ‘यारों’, ‘पल’, ‘कोई काहे कहते रहे’, ‘मैंने दिल से कहा’, ‘आवारापन बंजारापन’, ‘दस बहने’, ‘अजब सी’, ‘खुदा जाने’ आणि ‘दिल इबादत’ ही त्यांची प्रमुख गाणी आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KK (@kk_live_now)