घरताज्या घडामोडी'कर्नाटकचा सिंघम' झाला भाजपवासी; दिल्लीत केला पक्षप्रवेश!

‘कर्नाटकचा सिंघम’ झाला भाजपवासी; दिल्लीत केला पक्षप्रवेश!

Subscribe

दबंग सलमान खाननंतर अजय देवगणचा सिंघम सिनेमा तर सगळ्यांनीच पाहिला असेल. पण खऱ्या आयुष्यातही असे अनेक Singham पोलीस दलात काम करत आहेत. त्यातलेच एक कार्यक्षम पोलीस अधिकारी राहिलेले आणि ज्यांना Singham of Karnataka म्हणून ओळखलं जायचं, असे माजी IPS अधिकारी अन्नामलाई कुप्पूसामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अन्नामलाई यांनी गेल्याच वर्षी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तत्कालीन कर्नाटकच्या गृहसचिवांनी देखील ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र, खुद्द अन्नामलाई यांनी मात्र त्याला नकार दिला होता. अखेर आज त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव पी. मुरलीधर राव आणि तामिळनाडूचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या पक्ष मुख्यालयात अन्नामलाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

singham of karnataka annamalai kupusamy joins bjp

- Advertisement -

कोण आहेत अन्नामलाई?

अन्नामलाई २०११च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस अर्थात ASP म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग झाली होती. २०१५मध्ये उडुपीमध्ये त्यांना SP म्हणून बढती देण्यात आली. तिथून त्यांची कर्नाटकच्या चिकमंगळूर जिल्ह्यामध्ये एसपी म्हणून बदली करण्यात आली. शेवटी २०१८मध्ये त्यांना बंगळुरूमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून बदली देण्यात आली. याच पदावर असताना २०१९मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

अन्नामलाई यांना त्यांच्या कामामुळे ‘कर्नाटकचे सिंघम’ अशी ओळख मिळाली होती. ९ वर्षांच्या त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी समाजविघातक कृत्य करणाऱ्यांना आपल्या पोलिसी खाकीचा चांगलाच खाक्या दाखवला आहे. बेधडकपणे गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी कंबर कसणारा अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र, २०१९मध्ये आयुष्याला वेगळं वळण देण्यासाठी म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. तेव्हाच त्यांच्या राजकीय प्रवेशाविषयी तर्क सुरू झाले होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -