Coronavirus: २४ तासात ६९ हजार ९२१ नवे रुग्ण; ३६ लाखावर कोरोनाबाधित

India Corona Update:
India Corona Update:

भारतात गेल्या २४ तासांत ६९ हजार ९२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, कोरोनामुळे ८१९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३६ लाख ९१ हजार १६७ वर पोहचला आहे. दरम्यान २८ लाख ३९ हजार ८८३ कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. भारतात सध्या ७ लाख ८५ हजार ९९६ Active कोरोना रूग्ण असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.

२८ लाखाहून अधिक जण कोरोनामुक्त

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. मात्र, असे असताना देखील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील अधिक असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत देशात २८ लाख ३९ हजार ८८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या देशात ३६ लाखाहून अधिक जण कोरोनाबाधित आहेत. तर आतापर्यंत ६५ हजार २८८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

११,८५२ नवीन रूग्णांची नोंद

राज्यात सोमवारी, ११,८५२ नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १८४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ११,१८५ रूग्ण आज बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७,९२,५४१ झाली आहे.


हेही वाचा – आजपासून JEE परीक्षेला सुरूवात; परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी दाखल