घरदेश-विदेशमुलासाठी 'आई' बनलेला बाबा !

मुलासाठी ‘आई’ बनलेला बाबा !

Subscribe

सॅमच्या या अनोख्या कृतीचं जगभरातील लोकांकडून आणि विशेषत: सिंगल पॅरेंट्सकडून कौतुक होत आहे.

बऱ्याच घरांमध्ये मुलांच्या संगोपनासाठी एकच पालक असतात. ‘सिंगल पॅरेंट’ म्हणून मुलांना सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी असते. त्यातही आईविना मुलांना वाढवणं, त्यांना आईची माया आणि प्रेम देणं हे एकट्या वडिलांसाठी तितकं सोप्पं नसतं. मात्र, बऱ्याच घरातील असे ‘सिंगल डॅड’ निगुतीमे आपल्या मुलांचा सांभाळ करत असतात. त्यांना आईची उणीव भासू नये यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. थायलंडमधील अशाच एका वडिलांची आणि त्यांच्या अनोख्या प्रेमाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. आपल्या लहानग्या मुलासाठी ‘आई’ बनलेल्या या वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. थायलंडमध्ये राहणाऱ्या ५ वर्षीय ‘ओझोन’ या लहान मुलाची आई, त्याच्या लहानपणीच वारली होती. त्यामुळे ओझोनचे वडील ‘सॅम’ हेच त्याची आई आणि वडिल बनून त्याचं संगोपन करतात. ओझोनच्या शाळेमध्ये ‘मदर्स डे’च्या निमित्ताने खास सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सॅमने चक्क ओझोनची आई बनून त्याच्या शाळेत हजेरी लावली. महिलांसारखे कपडे घालून सॅम ओझोनसोबत त्याच्या शाळेत गेले आणि मदर्स डेच्या कार्यक्रमात ओझोनची आई म्हणूनच सहभागी झाले.

पाहा हा खास व्हिडिओ :

सौजन्य- फेसबुक

- Advertisement -

आपण पाहतो की सहसा शाळेतील पालक सभा असो किंवा एखादा कार्यक्रम अशावेळी मुलांसोबत त्यांची आईच जाते. आपल्या मुलांचं कौतुक ऐकायला आणि करायला आई नेहमीच पुढे सरसावते. मात्र, जगामध्ये सॅम सारखे वडीलही आहेत जे अशाप्रकारे चौकटीबाहेर जाऊन आपल्या मुलाचं संगोपन करतात. आपल्या मुलाला आईची कमी जाणवू नये यासाठी लोक काय म्हणतील याची पर्वा न करता, असं एखादं पाऊल उचलतात. दरम्यान सॅमच्या या अनोख्या कृतीचं जगभरातील लोकांकडून आणि विशेषत: सिंगल पॅरेंट्सकडून कौतुक होत आहे.

सौजन्य- फेसबुक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -