घरदेश-विदेशहृदयद्रावक कहाणी! शहीद भावाला राखी बांधायला ८०० किमी प्रवास करते बहीण

हृदयद्रावक कहाणी! शहीद भावाला राखी बांधायला ८०० किमी प्रवास करते बहीण

Subscribe

गेल्या १७ वर्षांपासून त्या नियमित येथे येऊन भावाच्या पुतळ्याला राखी बांधतात. यावर्षी त्यांनी शनिवारीच आपल्या भावाच्या पुतळ्याला राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.

रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव करण्याचा दिवस. यादिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून रक्षणाचं वचन घेते. तसंच, भावाच्या दिर्घायुष्यासाठी ती प्रार्थना करते. मात्र, एक अशी बहिण आहे जी आपल्या शहीद भावाला दरवर्षी ८०० किमी पायपीट करून राखी बांधायला जाते. शहीद भावाच्या पुतळ्याला राखू बांधून ती आपलं वचन पूर्ण करतेय. (Sister travelled 800 km for tie rakhi to martyr brother in uttar pradesh)

शहीद धर्मवीर सिंह शेखावत हे २००५ साली काश्मिरच्या लाल चौकात तैनात होते. त्यावेळी एका दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले. तेव्हापासून अहमदाबाद येथे राहणारी त्यांची बहिण उषा या त्यांना राखी बांधण्यासाठी उत्तर प्रदेशमधील दीनवा लाडखानी गावात जातात. या गावात धर्मवीर सिंह शेखावत यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याला त्या राखी बांधून रक्षाबंधन साजरा करतात. गेल्या १७ वर्षांपासून त्या नियमित येथे येऊन भावाच्या पुतळ्याला राखी बांधतात. यावर्षी त्यांनी शनिवारीच आपल्या भावाच्या पुतळ्याला राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.

- Advertisement -

हेही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियान; मंत्रालयात स्वातंत्र्योत्सवाचा जल्लोष

“माझा भाऊ देशाचं रक्षण करताना शहीद झाला. त्याची खूप आठवण येते. तो आता जिवंत नसला तरीही आमच्यासाठी तो जिवंतच आहे. आम्हाला नवे मार्ग दाखवायला तो आमच्यात जिवंत आहे,” असं उषा म्हणाल्या.

- Advertisement -

धर्मवीर सिंह शेखावत हे काश्मीरच्या लाल चौकात तैनात होते. २००५ साली त्यांना हौतात्म्य मरण आलं. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण गावावर शोककळा पसरली. दीनवा लाडखानी गावाला शहीदांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावात तीन शहिदांचे पुतळे आहेत. या पुतळ्यांना बघून आजही येथील तरुण लष्करात भरती होण्याचं स्वप्न पाहत असतात.

हेही वाचा – आम्ही वाक्य पूर्ण करण्याच्या आत होते ‘ब्रेकिंग न्यूज’, सरन्यायाधीशांची माध्यमांवर टीका

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -