घरदेश-विदेशहाथरस घटनेप्रकरणी SIT स्थापन; केस Fast Track कोर्टात चालवणार - योगी सरकार

हाथरस घटनेप्रकरणी SIT स्थापन; केस Fast Track कोर्टात चालवणार – योगी सरकार

Subscribe

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असताना आता योगी सरकारनेही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली असून या समितीला आठवड्याभराच्या आता रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे. तसेच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचा काल दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला असून मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी तिचा मृतदेह गावी आणला. मात्र, गावकरी आणि पीडिती कुटुंबीयांच्या विरोधानंतरही पोलिसांनी रातोरात या पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यामुळे हे प्रकरण अजूनच चिघळले असून येथील नागरिकांनी निदर्शने करण्यात सुरूवात केली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. जखमी मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारदरम्यान मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीला बलात्कारानंतर बेदम मारहाण करण्यात आली होती, इतकेच नव्हे तर तिची जीभ कापून पाठीचे हाड मोडले होते. हाथरसच्या चंदपा भागात आईसह चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर गावातीलच ४ नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवतीच्या किंचाळ्यामुळे नराधम पळून गेले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी मुलीला अलीगडच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. मात्र, तिची तब्येत अधिक बिघडल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते. अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसांनी ८ दिवसांनंतर सामूहिक बलात्काराचे कलम एफआयआरमध्ये समाविष्ट केले होते.

हेही वाचा –

Video : त्या पीडितेवर पोलिसांकडून रातोरात अंत्यसंस्कार; योगी सरकारवर काँग्रेसची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -