घरदेश-विदेशSita Lioness with Akbar Lion: विश्व हिंदू परिषद दोन सिंहांसाठी कोर्टात; नेमकं...

Sita Lioness with Akbar Lion: विश्व हिंदू परिषद दोन सिंहांसाठी कोर्टात; नेमकं घडलं काय?

Subscribe

पश्चिम बंगाल वनविभागाच्या निर्णयाविरोधात विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) न्यायालयात पोहोचली आहे

कोलकाता: पश्चिम बंगाल वनविभागाच्या निर्णयाविरोधात विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) न्यायालयात पोहोचली आहे. वास्तविक, सिलीगुडीतील सफारी पार्कच्या परिसरात वनविभागाने ‘अकबर’ नावाच्या सिंहासह ‘सीता’ नावाच्या सिंहिणीला ठेवले आहे. विभागाच्या या निर्णयाला विश्व हिंदू परिषदेने न्यायालयात आव्हान दिले आहे. (Sita Lioness with Akbar Lion Vishwa Hindu Parishad in Court for Two Lions What really happened)

सिलीगुडी सफारी पार्कमध्ये सिंहिणी ‘सीता’ आणि सिंह ‘अकबर’ यांना एकाच खोलीत ठेवण्याच्या पश्चिम बंगाल वन विभागाच्या निर्णयाला आव्हान देत विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) बंगाल शाखेने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

- Advertisement -

विश्व हिंदू परिषदेने 16 फेब्रुवारी रोजी जलपायगुडी येथील कलकत्ता उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचशी संपर्क साधला होता. आता या प्रकरणाची सुनावणी 20 फेब्रुवारीला (मंगळवारी) होणार आहे. या प्रकरणात राज्य वन विभागाचे अधिकारी आणि बंगाल सफारी पार्कचे संचालक यांना पक्षकार करण्यात आले आहे.

हा हिंदूंचा अपमान

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, वनविभागाने सांगितले की, सिंहांना नुकतेच त्रिपुरातून येथे आणण्यात आले होते. हे सिंह 13 फेब्रुवारीला सफारी पार्कमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांचे नाव बदलले नाही. अकबर या मुघल सम्राटाच्या नावावर असलेला सिंह हिंदू देवी म्हणून पूज्य असलेल्या सीतेसोबत एकाच आवारात ठेवण्यात आल्याने विश्व हिंदू परिषद संतप्त आहे. विश्व हिंदू परिषदेने राज्याच्या वनविभागाच्या सिंहांना नाव देण्याचा निर्णय, ‘अकबर’सोबत ‘सीता’ ठेवण्याचा निर्णय हिंदूंचा अपमान असल्याचे म्हटले आहे. सिंहिणी सितेचे नाव बदलण्याची मागणी संघटनेने केली आहे.

- Advertisement -

सफारीच्या संचालकाची बदली

या प्रकरणावर विश्व हिंदू परिशद आक्रमक झाली आहे. त्यानंतर बंगाल सफारी पार्कचे संचालक कमल सरकार त्यांची तत्काळ बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी विजय कुमार यांना संचालक बनवण्यात आलं आहे. दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेने प्राण्यांच्या नावावरून राजकारण सुरू केल्याचा आरोप राज्याचे वनमंत्री बीरबाहा हांसदा यांनी केला आहे.

(हेही वाचा: Politics : शिंदेंच्या ‘त्या’ दाव्यावर राऊत म्हणतात, बाळासाहेबांनी त्यांचा कडेलोट केला असता )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -