Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश कर्नाटकमध्ये जिलेटिनच्या भीषण स्फोट सहा जणांचा मृत्यू, एक जखमी

कर्नाटकमध्ये जिलेटिनच्या भीषण स्फोट सहा जणांचा मृत्यू, एक जखमी

Related Story

- Advertisement -

कर्नाटकमधील चिक्काबल्लापूर गावात जिलेटिन काड्यांच्या भीषण स्फोटात सहा जणांचा दुर्दैवी मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. खोदकाम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटिन काड्यांची विल्हेवाट लावताना हा भीषण स्फोट घडला आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दु:ख व्यक्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील या स्फोटात मृत्यू आणि जखमी झालेल्या व्यक्तींनी कारवाईच्या भीतीने बेकायदेशीर जिलेटिनचा साठा केला होता. परंतु आपल्यावर पोलीस कारवाई होऊ शकते या भीतीने त्यांनी जिलेटिनच्या काड्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र असे करत असतानाच हा भीषण स्फोट झाला आहे. यामुळे सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर चिक्काबल्लापूरचे जिल्हा प्रभारी डॉ. के. सुधाकर यांनी घटनास्थळी भेट देली आहे. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त करत बेकायदेशीरपणे जिलेटिनचा साठा करुन ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेवर दु:ख व्यक्त ट्विट केलं आहे. यावर बोलताना त्यांनी, “कर्नाटकातील चिक्काबल्लापूर येथे झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाली असून त्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती मिळो. जखमी झालेले लोक लवकर बरे होवोत अशी मी प्रार्थना करतो”. असे म्हणाले. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे आदेश दिले आहेत. यावेळी ट्विटवरून बी. एस. येडियुरप्पा यांनी “जिलेटिनच्या स्फोटांमुळे चिक्काबल्लापूर गावात हिरेनागावल्ली गावाजवळ सहा जणांचा मृत्यू झाला असून ही धक्कादायक बाब आहे. जिल्हा प्रभारी मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत” अशी माहिती दिली आहे.


हेही वाचा- Petrol-Diesel Price: दोन दिवसांनंतर पुन्हा इंधन दरवाढ; जाणून घ्या आजचे दर…

- Advertisement -

 

- Advertisement -