Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश राजस्थान, उत्तर प्रदेशातून सहा दहशतवाद्यांना अटक

राजस्थान, उत्तर प्रदेशातून सहा दहशतवाद्यांना अटक

दाऊदचा भाऊ अनिसने केली होती मदत

Related Story

- Advertisement -

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान संघटित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. स्पेशल सेलने सहा जणांना अटक केली असून यापैकी दोन पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवादी देखील आहेत. या दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये कुविख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनिस इब्राहिम याने मदत केल्याची माहिती उजेडात आली आहे. स्पेशल सेलचे विशेष पोलीस आयुक्त निरज ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. स्पेशल सेलने केलेल्या कारवाईत स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त केली आहेत. अटकेची ही कारवाई राजस्थानमधील कोटा, उत्तर प्रदेशात करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांचे एक महिन्यापासून हे ऑपरेशन सुरू होते. स्लिपर सेलच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया सुरू होत्या.
आम्ही समीर याला कोटा येथून अटक केली. दोन जणांना दिल्लीतून तर तिघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. या सहाजणांपैकी दोघे मस्कदहून पाकिस्तानला गेले होते. तेथे त्यांना स्फोटके आणि एके-४७ रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सांगितले.

- Advertisement -

अटक करण्यात आलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्कदहून पाकिस्तानला जाताना त्यांच्यासोबत बंगाली भाषा बोलणारे १४ ते १५ जण होते. त्यांनीही असेच प्रशिक्षण घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सिद्ध होते की, हे ऑपरेशन सीमेपलीकडून हाताळण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे विशेष पोलीस आयुक्त निरज ठाकूर यांनी दिली. विशेष म्हणजे हे दहशतवादी महाराष्ट्रात रेकी करून गेल्याची माहितीही उघडकीस येत आहे.
दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल जवळपास महिनाभरापासून या ऑपरेशनसाठी काम करत होते. हे दहशतवादी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांना लक्ष्य करण्यासाठी कट रचत होते. त्यांच्याकडून स्फोटकं आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यातील दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते दिल्ली, यूपी आणि महाराष्ट्रात फिरून रेकी करत होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांना अटक केली. आता पोलीस त्यांची रिमांड घेतील आणि चौकशी करतील. हे दहशतवादी शेवटी कोणत्या उद्देशाने इथे आले होते आणि त्यांचा खरा हेतू आणि लक्ष्य काय होते हे चौकशीनंतरच उघड होईल.

- Advertisement -