घरताज्या घडामोडीमोस्ट वॉन्टेड आरोपीचं स्केच मार्क झुकेरबर्गशी जुळलं, कोलंबियन पोलिसांनी ठेवलाय २२ कोटींचं...

मोस्ट वॉन्टेड आरोपीचं स्केच मार्क झुकेरबर्गशी जुळलं, कोलंबियन पोलिसांनी ठेवलाय २२ कोटींचं इनाम

Subscribe

अज्ञात हल्लेखोरांनी हेलिकॉप्टरच्या दिशेने गोळीबार केला

कोलंबियातील मोस्ट वॉन्टेड आरोपीचा स्केच फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्याशी मिळता जुळता आहे. कोलंबियन पोलिसांनी केलेल्या पोस्टमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या मोस्ट वॉन्टेड आरोपीला पकडून देणाऱ्याला ३ मिलियन डॉल म्हणजे तब्बल २२ कोटी ३० लाख ८६ हजार रुपये मिळणार असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तुफान व्हायरल झाली आहे. कोलंबियन पोलिसांच्या फेसबुक पेजवर हे स्केच पोस्ट करण्यात आला आहे. परंतु त्याचा चेहरा मास्क झुकेरबर्ग यांच्याशी मिळताजुळता असल्यामुळे नेटकऱ्यांनी अश्चर्यच व्यक्त केलं आहे.

काय आहे प्रकरण

कोलंबियाच्या पोलिसांनी २ फोटो पोस्ट करत गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पोलिसिया नॅशनल डी लॉस कोलम्बियानो या फेसबुक आयडीवरुन पोलिसांनी आरोपींचे स्केच आणि गुन्ह्याबाबत माहीती दिली आहे. या आरोपींना पकडण्यात मदत करा असे आवाहन करत पोलिसांनी यांना पकडून दिल्यास ३ मिलियन डॉलरचा धनादेश मिळणार असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी पोस्ट केलेल्या २ फोटोंपैकी एका फोटोचं स्केच हे मार्क झुकेरबर्गच्या चेहऱ्याशी जुळलं आहे. पोलिसांनी केलेल्या पोस्टवर आतापर्यंत अनेकांनी मार्क झुकेरबर्ग यांना टॅग करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. २२ हजारपेक्षा अधिक जणांनी शेअर केली असून ६६ हजारपेक्षा अधिक नेटकऱ्यानी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisement -

राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरवर गोळीबार

कोलंबियाचे राष्ट्रपती इवान डुके हे दौऱ्यावर होते हेलिकॉप्टरमध्ये असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी हेलिकॉप्टरच्या दिशेने गोळीबार केला. यामुळे हेलिकॉप्टरला नुकसान झाले परंतु पायलटच्या प्रसंगावधानामुळे सुरक्षित लंडिंग करण्यात आले आहे. घटनास्थळी असलेल्यांनी दोन अज्ञात हल्लेखोरांना गोळीबार करताना पाहिले आहे. याआधारे कोलंबिया पोलिसांनी स्केच तयार करुन तपासाला सुरुवात केली आहे. तपासामध्ये गती येण्यासाठी पोलिसांनी फेसबुकवर स्केच पोस्ट केले पंरतु यातील एकाचा चेहरा मार्क झुकेरबर्गशी जुळला असल्यामुळे धुमाकूळ माजला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -