CoronaVirus चं आणखी एक नवं लक्षण आलं समोर!

ब्रिटनमधील वैद्यकीय शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचे एक नवीन लक्षणाची माहिती दिली आहे.

corona
कोरोना

जगभरात दिवसेंदिवस कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत आहे, अशा परिस्थितीत कोरोनाचं आणखी एक नवं लक्षण समोर आल्याने सगळ्यांच्याच मनात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ब्रिटनमधील वैद्यकीय शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचे एक नवीन लक्षणाची माहिती दिली आहे. तसेच नेशनल हेल्थ सर्विसने त्यास कोरोनाच्या अधिकृत लक्षणांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचे आवाहन केले आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, स्किन रॅशेस (Skin Rashes) कोरोनाचे नवं लक्षण असण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या नवीन लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर असे आढळले की, प्रत्येक ११ कोरोना रुग्णांपैकी एकाच्या त्वचेवर रॅशेज दिसून येते. रिसर्च हेड, डॉ. मारिओ फाल्ची यांच्या मते, कोरोना रूग्णांना कित्येक आठवड्यांपर्यंत त्वचेची समस्या अर्थात स्किन रॅशेस असतात.

किंग्ज कॉलेज लंडनमधील शास्त्रज्ञांनी २० हजार लोकांचा अभ्यास केला. यामध्ये कोरोना संक्रमित असलेल्या लोकांचा आणि कोरोना संक्रमणाबद्दल संशयास्पद असलेल्या रूग्णांचा समावेश होता. अभ्यासादरम्यान असे दिसून आले की ब्रिटनमधील कोरोना संसर्ग झालेल्या ९ टक्के लोकांना स्किन रॅशेजची समस्या आहे. तर कोरोनाच्या इतर लक्षणांसह ८ टक्के लोकांमध्येही रॅशेजची समस्या दिसून आली.

ब्रिटनच्या नेशनल हेल्थ सर्विसच्या अधिकृत यादीमध्ये सध्या कोरोनाची केवळ तीन लक्षणे आहेत. ताप, वारंवार कफ आणि वास आणि चव ओळखण्याची क्षमता नसणे. तर भारतीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाइटवर, ताप, थकवा आणि कोरडा कफ ही कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत. यासह, काही रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होणे, अंग दुखणे, सर्दी, घसा खवखवणे आणि अतिसाराची लक्षणे आढळली आहेत.

दरम्यान, डब्ल्यूएचओच्या कोरोनाच्या मुख्य लक्षणांमध्ये ताप, कोरडा कफ आणि थकवा जाणवणे अशी लक्षणं समाविष्ट आहे. इतर लक्षणांमध्ये शरीरात वेदना होणं, नाक सर्दीने जाम होणं, डोकेदुखी, घसा खवखवणे, अतिसार, गंध कमी होणे आणि चव न ओळखता येणं, त्वचेवर पुरळ येणे, बोटांची रंग बदलणं यांचा समावेश आहे.


घसा खवखवला, पण कोरोना नाही तर किडा निघाला!