घरअर्थजगतवैयक्तिक आयकराचे दर कमी करा, अर्थसंकल्पासाठी सीआयआयचा अहवाल

वैयक्तिक आयकराचे दर कमी करा, अर्थसंकल्पासाठी सीआयआयचा अहवाल

Subscribe

नवी दिल्ली – आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. याआधी इंडस्ट्री बॉडी कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने आगामी अर्थसंकल्पासाठी आपला अजेंडा सादर केला आहे. यामध्ये वैयक्तिक आयकराचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचा फायदा जवळपास ५.८३ करदात्यांना होणार आहे. तसंच, यामुळे उत्पन्नातून प्रत्यक्ष कर भरणाऱ्या ग्राहकांच्या हातात अधिक रक्कम शिल्लक राहील. तसंच, यामुळे जीएसटीच्या अंतर्गत येणाऱ्या वस्तूंच्याही किमती कमी होऊ शकतात, असं सीआयआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

सुधारणांच्या पुढील टप्प्यात वैयक्तिक आयकर दर कमी करण्यात यावा. यामुळे डिस्पोजेबल उत्पन्न वाढणार आहे. ज्यामुळे मागणी चक्रालागती मिळेल. तसंच, व्यवासायातील गुन्हा सिद्ध होईपर्यंत संबंधिताला अटक करू नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पांच्या पूर्व बैठकांना सुरुवात केली आहे. आज दिल्लीत त्यांनी उद्योगपतींसोबतच चर्चा केली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत कराड उपस्थित होते. तसंच, अर्थ सचिव टीवी सोमनाथनही उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -