घरदेश-विदेशजगभरात मोबाईलवर सर्वाधिक बिझी असलेल्यांच्या यादीत भारतीय तिसऱ्या क्रमांकावर!

जगभरात मोबाईलवर सर्वाधिक बिझी असलेल्यांच्या यादीत भारतीय तिसऱ्या क्रमांकावर!

Subscribe

जाणून घ्या कोणता देश कितव्या स्थानी..

जगातील प्रत्येक जण आज सोशल मीडिया, मोबाईलच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोबाइल आणि इंटरनेट आज लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. आज प्रत्येकाला स्मार्टफोन आणि इंटरनेट याशिवाय कोणताच पर्याय नाही कारण आजकाल सर्व कामं ही ऑनलाइन होताय. मग ते मोबाईल रिचार्ज असो, मनी ट्रान्सफर असो, तिकिट बुकिंग किंवा गॅस सिलिंडरची बुकिंग असो. या सर्व गोष्टी स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज केल्या जात आहेत. त्यामुळे स्मार्टफोनवर सर्वाधिक वेळ घालवणाऱ्यांचे प्रमाणात देखील वाढले आहेत. एका नव्या अहवालानुसार, जगभरात मोबाईलवर सर्वाधिक बिझी असलेल्यांच्या यादीत भारतीय तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे.

ब्राझीलचे लोकं अव्वल स्थानी

ZDNet च्या अहवालानुसार मोबाइल वापराच्या बाबतीत ब्राझीलचे नागरिक प्रथम क्रमांकावर आहेत. ब्राझीलचे नागरिक दररोज सरासरी ५ तास ४ मिनिटे इतका वेळ मोबाइल वापरतात. दुसर्‍या स्थानावर इंडोनेशियातील नागरिक आहेत. इंडोनेशियन लोक दररोज मोबाईलवर सरासरी ५ तास ३ मिनिटे घालवतात. तर या सर्वेक्षणात भारताचा नंबर तिसर्‍या क्रमांकावर आहे. भारतीय दररोज सरासरी ४ तास ९ मिनिटे मोबाइलचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

कोणता देश कितव्या स्थानी..

तसेच ZDNet च्या या अहवालात जगातील १० देशांचा समावेश करण्यात आला आहे. भारतानंतर सर्वाधिक मोबाईल वापराच्या बाबतीत दक्षिण कोरिया चौथ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी लोक दररोज ४ तास ८ मिनिटे मोबाइलचा वापर करतात. तर पाचव्या क्रमांकावर मेक्सिकन नागरिक असून ते सरासरी ४ तास ७ मिनिटे मोबाईलचा वापर करतात. तुर्कीचे लोक दररोज ४ तास ५ मिनिटे मोबाइल वापरत असून ते तुर्की सहाव्या क्रमांकावर, जपान ४ तास ४ मिनिटांसह सातव्या क्रमांकावर, कॅनडा ४ तास १ मिनिटांसह ८ व्या, अमेरिका ३ तास ९ मिनिटांसह ९ व्या स्थानावर आणि ब्रिटन ३ तास ८ मिनिटांसह दहाव्या स्थानावर असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -