घरCORONA UPDATEसिगारेट ओढणाऱ्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका - IIT

सिगारेट ओढणाऱ्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका – IIT

Subscribe

आयआयटी जोधपूरच्या वैज्ञानिकांनी एका अभ्यासानुसार अनुमान काढले आहे की, कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका हा धुम्रपान करणाऱ्यांना होतो. आयआयटीच्या वैज्ञानिकांचा चमू ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, अशा प्रकरणांचा अभ्यास करत आहे. या वैज्ञानिकांनी सांगितले आहे की, ज्या लोकांमध्ये पदार्थाचा वास घेण्याची क्षमता कमी झाली असेल किंवा पदार्थाची चव ओळखता येत नसेल तर अशा लोकांनी स्वतःला क्वारंटाइन करुन घ्यावे. त्यानंतर लगेचच डॉक्टारांचा सल्ला घेतला पाहीजे.

दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेतील सीडीसी या संस्थेने कोरोना व्हायरसची सहा नवीन लक्षणे जगाला सांगितली होती. यामध्ये पदार्थाची चव ओळखता न येणे या लक्षणाचा देखील समावेश होता. तसेच अमेरिकन केमिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या “कोविड १९ महामारीची न्यूरोलॉजिकल आंतरदृष्टी” या अहवालात देखील काही बाबी निदर्शनास आणल्या होत्या. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये चव ओळखण्याची क्षमता नाहीशी होणे. तसेच रुग्णाच्या पुर्ण केंद्रीय नर्वस सिस्टिम (CNS) आणि मस्तिष्कच्या संरचनेवर कोरोना व्हायरसचा गंभीर परिणाम होत असल्याचे या अहवालात सांगितले होते.

- Advertisement -

आयआयटी जोधपूरचे प्राध्यापक सूरजजीत घोष यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन पार पडले. घोष यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस न्यरोलॉजिकल संक्रमणाला बाधिक करण्याची संभावना धुम्रपान करणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत जलदगतीने होऊ शकते. तसेच दुसऱ्या एका संधोधनानुसार धुम्रपान आणि तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तिंना कोविड १९ चे संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -