घरताज्या घडामोडीबिनशर्त माफी मागा आणि...स्मृती इराणींची काँग्रेस नेत्यांना नोटीस

बिनशर्त माफी मागा आणि…स्मृती इराणींची काँग्रेस नेत्यांना नोटीस

Subscribe

गोव्यातील सिली सोल्स कॅफे अँड बारवरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर काँग्रेसने आरोप केले आहेत. त्यांच्या मुलीचे नाव समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. या प्रकरणात स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नेट्टा डिसूझा आणि काँग्रेस यांना त्यांच्या १८ वर्षांच्या मुलीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेत्यांना लेखी बिनशर्त माफी मागीवी आणि तत्काळ प्रभावाने आरोप मागे घेण्यात येण्याची मागणी केली आहे. गोव्यातील एका बारची मालकी इराणी यांच्या मुलीकडे असून याचा परवानाही बोगस असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

- Advertisement -

या प्रकरणावर इराणी यांनी प्रत्युत्तर देताना, अमेठीत झालेला पराभव गांधी घराण्याला पचवता आलेला नाही. त्यातूनच माझ्या कुटुंबीयांवर असे आरोप होत आहेत, असे प्रत्युत्तर दिले. तसेच २०२४ मध्ये राहुल गांधी अमेठीतून उभे राहिले तरी ते पराभूत होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी आज १८ वर्षाच्या मुलीवर आरोप केले असून त्या मुलीचा दोष एवढाच आहे की, तिची आई स्मृती इराणी ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध पत्रकार परिषद घेते. महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलीचा एवढाच दोष आहे की, तिच्या आईने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पाच हजार कोटींच्या लुटीवर पत्रकार परिषद घेतली होती, असे इराणी यांनी म्हटले होते.


हेही वाचा : द्रौपदी मुर्मू उद्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार, २१ तोफांची सलामी दिली


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -