घर देश-विदेश केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मारली डुबकी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मारली डुबकी

Subscribe

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज कुंभ मेळ्याच्या पहिल्या दिवशी गंगेत डुबकी मारली आहे. याचे फोटो हे ट्विटरवर टाकण्यात आले आहे. हर हर गंगे म्हणत त्यांनी आज सकाळी गंगेत डुबकी मारली.

उत्तर प्रदेशात कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. लाखोंच्या संख्येने येथे साधू संत आले आहेत. येथील प्रयागराज येथे शाही स्नान करण्यासाठी अनेकांनी उपस्थिती लावली. अगोदर मेळ्यातील साधू संत यांनी या ठिकाणी आंघोळ केली. यानंतर इतरांनीही येथे आंघोळ केली आहे. या मेळ्याच्या पहिल्या दिवशी लोकांनी मोठ्या संख्यने उपस्थिती लावली. या लोकांबरोबरच राजकीय मंत्र्यांनी गंगेत डुबकी मारली. यामध्ये केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनीही सकाळी गंगेत डुबकी मारली. इराणी यांनी आपले फोटो ट्विटरवरून शेअर केले आहेत. याबरोबर त्यांनी लोकांना आजपासून सुरु होणाऱ्या कुंभ मेळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनीही दिल्या शुभेच्छा

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या कुंभमेळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रयागराजमध्ये सुरु झालेल्या कुंभमेळ्याच्या भाविकांना शुभेच्छा. यावेळी देश – परदेशातील भाविक या मेळ्याला उपस्थित राहून अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधतेचे दर्शन घेतील. अधिक नागिरक या मेळ्याचा लाभ घेतील.” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -