स्मृती इराणी ९० च्या दशकात ‘मॅक्डोनल्डस्’मध्ये काम करायच्या

केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांच्याबाबत एक आगळीवेगळी माहिती समोर आली आहे. स्मृती इराणी ९० च्या दशकांत 'मॅक्डोनल्डस्'मध्ये काम करायच्या. त्यांच्या पगारातून कापला जाणारा पीएफ (भविष्य निर्वाह निधी) त्यांनी परत घेतलेला नाही. त्यांच्या पीएफ सर्टिफिकेटचा आता लिलाव होणार आहे.

smriti irani was worked at mcdonalds in nineties her PF certificate will auction for women employees
स्मृती इराणी ९० च्या दशकात 'मॅक्डोनल्डस्'मध्ये काम करायच्या

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात जिंकून आलेल्या भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांच्याबाबद धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्मृती इराणी ९० च्या दशकांत मुंबईच्या वांद्रा येथील प्रसिद्ध फूड कंपनी ‘मॅक्डोनल्डस्’मध्ये काम करायच्या, अशी माहिती ‘हिंदूस्तान टाइम्स’ने दिली आहे. मॅकडोनॉल्डमध्ये काम करत असताना इराणी यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी (पीएफ) जे पैसे कापले गेले होते, ते पैसे त्यांनी परत घेतलेले नाहीत. दरम्यान, त्यांच्या या पीएफ सर्टिफिकेटचा लिलाव होणार आहे.

हेही वाचा – स्मृती इराणींनी केली आशा भोसलेंची सुटका

लिलावातून मिळणारे पैसे दिले जाणार महिला कर्मचाऱ्यांना

स्मृती इराणी यांनी बर्गर पॉईंट्स येथून आपला पीएफ घेतला नव्हता. त्यामुळे साधारण तीन दशकांनंतर कॉटन टेक्स्टाइल्स एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचा सदस्य त्यांचे पीएफ सर्टिफिकेट शोधत आहे. या पीएफ सर्टिफिकेटच्या लिलावाचे नियोजन देखील कॉटन टेक्स्टाइल्स एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलने केले आहे. या लिलावातून मिळाणारे पैसे महिला कर्मचाऱ्यांना मदत म्हणून दिले जाणार आहेत.

हेही वाचा – राहूल गांधींना हरविल्यानंतर स्मृती इराणींनी फेडला सिद्धिविनायकाचा नवस?

मॅकडोनॉल्ड नंतर टीव्ही मालिकेत केले काम

‘मॅक्डोनल्डस्’ येथील कामानंतर स्मृती इराणी यांना एका टीव्ही मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे या मालिकेत त्यांना मुख्य भूमिका मिळाली. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ असे या मालिकेचे नाव होते. या मालिकेत त्यांचे तुलसी नावाचे पात्र होते. या मालिकेतील कामावरुन लोकांनी स्मृती इराणी यांचे कौतुक केले. त्यानंतर स्मृती इराणी यांनी मागे वळून पाहिले नाही. २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपने त्यांना मंत्रिपदाची संधी दिली. याशिवाय २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही त्यांना भाजप कडून केंद्रिय मंत्रिपद देण्यात आले.