Booster Dose India: बूस्टर डोससाठी तुमचा नंबर केव्हा येणार? सरकार पाठवणार SMS अलर्ट

vaccine booster dose india schedule experts say 9 month gap for precautionary dose unscientific
...तर 9 महिन्यांत बूस्टर डोस घेण्याचा काहीच फायदा नाहीच; तज्ज्ञांनी सांगितले कारण

जगभरातील अनेक देशांनी बूस्टर देण्यास सुरुवात केली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून भारतात देखील बूस्टर डोस दिला जाणार आहे. कोरोना योद्धांना आणि हृदयविकासारख्या गंभीर आजारीग्रस्त ६० वर्षांवरील लोकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. जर तुम्ही आणि तुमचे नातेवाईक या श्रेणीत येत असाल तर बूस्टर डोस कोणत्या दिवशी दिला जाईल हे कसे समजेल? याबाबत जाणून घ्या.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाल्यानंतर बूस्टर डोस दिला जाईल. यासाठी कोविनवर रजिस्ट्रेशन आवश्यक असणार आहे. एका मुलाखतीमध्ये कोविन अध्यक्ष डॉ. आरएस शर्मा म्हणाले की, लसीचे दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी आणि गंभीर आजारग्रस्त असलेले वरिष्ठ नागरिक यांना बूस्टर डोससाठी नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर एसएमएस येईल.

खबरदारी म्हणून बूस्टर डोस १० जानेवारी २०२२पासून दिला जाणार आहे. बूस्टर डोस म्हणून कोणत्या लसीचा वापर केला जाईल, याबाबत लवकरच स्पष्ट केले जाईल. दरम्यान १५-१८ वर्षांचा मुलांना कोव्हॅक्सिन दिली जाणार आहे.

डॉ. शर्मा म्हणाले की, वरिष्ठ नागरिकांची कोविन प्लेटफॉर्मवर पहिल्यापासून नोंदणी असेल कारण त्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. जसे दुसरा डोस दिल्यानंतर ९ महिने पूर्ण होतील, तसा कोविन अॅपद्वारे एक एसएमएस पाठवला जाईल. जरी गंभीर आजार असेल, तरी आता प्रिकॉशनरी (बूस्टर) डोस घेऊ शकतात. त्यानंतर युजर त्याच मोबाईल नंबरहून प्रिकॉशनरी डोससाठी बुकींग करू शकतात.


हेही वाचा – Omicron Variant : आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणावर ओमिक्रॉनचे संकट; जगभरात हजारो उड्डाणे रद्द