झोपेत घोरणाऱ्यांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका तीनपट अधिक; संशोधन

snorers could face three times higher risk of death from coronavirus
झोपेत घोरणाऱ्यांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका तीनपट अधिक; संशोधन

अनेकांना झोपेच्या वेळी खूप मोठ मोठ्यांनी घोरण्याची सवय असते. यामुळे इतर लोकांना झोप लागणे कठीण होते. पण आता झोपेच्या वेळी घोरणाऱ्या लोकांनी सावध राहिल पाहिजे. कारण अशा लोकांमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्युचे प्रमाण तीन पटीने जास्त असते, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वावरिकच्या वैज्ञानिकांनी ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया आणि कोरोना व्हायरसच्या १२ अभ्यासाचा आढावा घेतला. या अभ्यासामध्ये त्यांना असे आढळले की, ‘हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले आणि झोपेच्या वेळी घोरणाऱ्या कोरोना रुग्णात मृत्युचा धोका तीन पटीने जास्त असतो.’

घश्याच्या स्नायूं रिलॅक्स  (obstructive sleep apnoea)  झाल्यामुळे, त्यांचे वायुमार्ग तात्परते बंद होतात, ज्यामुळे लोक घोरू लागतात. अशाच हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या जीवला व्हायरचा जास्त धोका असतो, असे संशोधकांना आढळले.

माहितीनुसार, मुधमेह (Diabetes), लठ्ठपणा (Obesity) आणि उच्च रक्तदाब (High blood bressure) असलेल्यांना ही समस्या खूप सामान्य पातळीवर आहे. या सर्व आजारांमध्ये कोरोनापासून मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते. ब्रिटनमध्ये सुमारे १५ लाख लोक ‘ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया’ चे शिकार झाले आहेत. ज्यामध्ये ८५ टक्के लोकांचे निदान झाले नाही आहे. अमेरिकेत तर सव्वा दोन कोटी लोक या आजाराचे शिकार झाले आहेत.

वैज्ञानिकाचे म्हणणे आहे की, ‘कोरोना रुग्णांच्या आरोग्यावर ‘ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया’चा परिणाम समजण्यासाठी अद्याप अधिक संशोधन गरजेचे आहे.’ संशोधनातील तज्ज्ञ मिशेल मिलर म्हणतात की, ‘जेव्हा संशोधनाचे नकारात्मक परिणाम समोर येतील तेव्हा आश्चर्यचकीत होण्याची गरज नाही आहे. ‘ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया’चा लठ्ठपणासारख्या सर्व आजारांशी संबंध आहे. ज्यामध्ये कोरोना रुग्णांचा जीव जास्त धोक्यात असतो. यामुळे ‘ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया’ असलेल्या रुग्णांना कोरोनाच्या संपर्कात येण्यापूर्वी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच यासाठी उपचार व्यवस्थित करा आणि काळजी घ्या. मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवा. तसेच लक्षणे दिसताच चाचणी करून घ्या. आपल्या उपचारांबद्दल अधिक सतर्क राहा.’

तसेच मिशेल मिलर पुढे म्हणाले की, ‘कोरोनामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि जळजळ होण्याचे प्रमाण वाढते. ज्यामुळे ब्रॅडीकिनिन शरीरातील रक्तदाब नियंत्रित करण्याच्या मार्गावर विपरीत परिणाम होतो. ‘ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया’मध्ये देखील या प्रकारची समस्या आहे.

या अभ्यासामध्ये भाग घेणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले की, ‘ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया’ ग्रस्त असलेल्या १० मधील ८ कोरोना रुग्णांना जास्त धोका असतो. डायबिटीज और ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनियामुळे १ हजार ३०० रुग्ण ७ दिवसांत हॉस्पिटमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यात मृत्युचे प्रमाण २.८ टक्के वाढले. ‘


हेही वाचा – तर इराणवर करू मोठा हल्ला, ट्रम्प यांची धमकी