…म्हणून काँग्रेसने मोदींना शिव्या देणं सुरू केलं, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

अहमदाबाद – गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराला जोर आला आहे. त्यातच, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गुजरातमध्ये जाऊन प्रचार फेऱ्या करत आहेत. या वेळी त्यांनी काँग्रेसवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. आजपर्यंतचा इतिहास आहे, काँग्रेसला जेव्हा जेव्हा त्यांचा पराभव होताना दिसला तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते मोदींनी शिव्या देणं सुरू करतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. अहमदाबादमधील भाजपा मीडिया सेंटटरमध्ये ते गुरुवारी बोलत होते.

हेही वाचा -इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादीला देणार का? जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल

“जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा काँग्रेसला त्यांचा पराभव खूप स्पष्टपणे दिसत आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहा, काँग्रेसला जेव्हा जेव्हा त्यांचा पराभव होताना दिसलं तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते मोदींना शिव्या देणं सुरू करतात. मोदींच्या विकासाच्या मॉडेलला काहीही तोड नाही, त्यापेक्षा मोठं मॉडेल आपण दाखवू शकत नाही आणि त्याचा विचारही करू शकत नाही, असं काँग्रेस नेत्यांना लक्षात येतं तेव्हा ते मोदींना शिव्या देणं सुरू करतात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


ज्यांनी प्रभू रामांच्या अस्तित्वालाच नाकारलं आणि खरंच रामाचा जन्म झाला होता का असा प्रश्न उपस्थित केला असे लोक ७०० वर्षांचा कलंक मिटवून रामललांच्या मंदिराच्या निर्मितीचं काम सुरू केलं त्यांना रावणाची उपमा देत आहेत, असंही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – राज ठाकरेंचा आरोप धादांत बिनबुडाचा; अजित पवारांचे प्रत्युत्तर