घरताज्या घडामोडीचीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग नजरकैदेत?, सुब्रमण्यम स्वामींच्या ट्वीटनंतर चर्चांना उधाण

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग नजरकैदेत?, सुब्रमण्यम स्वामींच्या ट्वीटनंतर चर्चांना उधाण

Subscribe

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना राष्ट्रपती भवनात नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. चीनशी संबंधित असलेल्या सोशल मीडियावरून याबद्दल विविध प्रकारचे दावे केले जात आहेत. परंतु भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्वीटनंतर चर्चेला उधाण आलं आहे.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना खरोखरच नजरकैदेत ठेवण्यात आलंय का?, चीनमधून पसरलेल्या या अफवेचा तपास व्हायला हवा. शी जिनपिंग समरकंदमध्ये शांघाय सहकारी संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले असताना कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी त्यांना लष्कराच्या प्रभारी पदावरून हटवलं. त्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं, अशी अफवा असल्याचं स्वामींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच या ट्वीटनंतर एक व्हिडीओदेखील व्हायरल करण्यात आला आहे.

- Advertisement -

चीनमध्ये लष्कराच्या हालचालींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चीनमधील कम्युनिस्ट पक्षानं जिनपिंग यांना लष्करप्रमुख पदावरून हटवून नजरकैदेत ठेवल्याचा दावा चीनशी संबंधित अनेक सोशल मीडिया अकाऊंट्सवरून केला जात आहे

- Advertisement -

शी जिनपिंग समरकंदहून परतताच १६ सप्टेंबरलाच त्यांना विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं, असा दावा अफवांमधून केला जात आहे. जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची दाट शक्यता आहे कारण चीनमधील अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : दिलासादायक : राज्यात 619 नवे कोरोनाबाधित, 686 जणांची मात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -