काही लोकांच्या भाषणातून त्यांची योग्यता समजते; पंतप्रधानांचा राहुल गांधींना टोला

'काही लोकांच्या भाषणातून त्यांची योग्यता समजते', असा टोला नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेला आज लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

‘काही लोकांच्या भाषणातून त्यांची योग्यता समजते’, असा टोला नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेला आज लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. आधीच हिंडेनबर्ग अदानी प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. या सर्वांना नरेंद्र मोदी यांनी जोरदार उत्तर दिले आहे. (Some people know their worth from their speech Prime Minister Narendra Modi Slams Rahul Gandhi)

“अनेकांनी आपली मते येथे मांडली. प्रत्येकाचं बोलणं ऐकताना हेही लक्षात येतं की कोणाकडे किती क्षमता आहे. ते किती समजूतदार आहेत आणि कोणाचा हेतू काय आहे. काही लोकांच्या भाषणानंतर इकोसिस्टम उसळत होती. समर्थक उड्या मारत होते”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

विरोधकांनी राष्ट्रपतींचा अपमान केला – नरेंद्र मोदी

राष्ट्रपतींचे भाषण सुरू असताना काही लोकांनी पलटी मारली. एका बड्या नेत्याने तर राष्ट्रपतींचा अपमान केला. आदिवासी समाजाप्रती द्वेषही दाखवला आहे. टीव्हीवर अशा गोष्टी बोलल्या गेल्या की आत द्वेषाची भावना निर्माण होते, सत्य बाहेर येत राहते. त्यानंतर पत्र लिहून पळून जाण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चा ऐकत असताना मला वाटले की अनेक गोष्टी मूकपणे स्वीकारल्या गेल्या आहेत. राष्ट्रपतींच्या भाषणावर कोणाचाही आक्षेप किंवा टीका नाही”, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

“मोठ-मोठे घोटाळे आणि सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार यापासून देशाला स्वातंत्र्य हवे होते, ते देशाला मिळत आहे, असे राष्ट्रपतींनी भाषणात सांगितले. आज देश वेगाने विकासाच्या मार्गावर आहे. आज जगातील समस्या सोडवण्याचे भारत माध्यम बनत आहे. देशातील लोकांनी ज्या मूलभूत सुविधांसाठी अनेक दशके वाट पाहिली, त्या या वर्षांत मिळाल्या आहेत”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


हेही वाचा – काही लोक सर्वोच्च न्यायालयाला सल्ले द्यायला लागले; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार