श्रीलंकेत जनता महागाईने त्रस्त, पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलक कॅरम खेळण्यात व्यस्त

श्रीलंका मोठ्या आर्थिक आणि राजकीय संकटाला तोंड देत आहे. परंतु भारताने श्रीलंकेला मोठी मदत जाहीर केली आहे. श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती स्थिर व्हावी म्हणून भारताने श्रीलंकेला ३.८ अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. परंतु श्रीलंकेतील पंतप्रधानांच्या ‘टेम्पल ट्री’ या अधिकृत निवासस्थानातील काही दृश्यं समोर आली आहेत. ज्यामध्ये आंदोलक कॅरम खेळताना दिसत आहेत, तर काही आंदोलक हे आराम करत असून काही लोक आवारात फिरत आहेत.

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या निवासस्थानावर काल आंदोलकांच्या गर्दीने थैमान घातलं आहे. श्रीलंका आणि येथील लोक ज्या आव्हानांना तोंड देत आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही श्रीलंकेतील लोकांच्या पाठीशी उभे आहोत, असे भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच याबाबत भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे.

श्रीलंकेतील भीषण आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भारताने यावर्षी ३.८ अब्ज अमेरिकन डॉलरहून अधिक मदत दिली आहे. श्रीलंका आणि येथील लोकं ज्या अनेक आव्हानांना तोंड देत आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती आहे. आम्ही श्रीलंकेतील लोकांच्या पाठीशी उभे आहोत, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले. भारताने यावर्षी श्रीलंकेतील भीषण आर्थिक परिस्थिती दूर करण्यासाठी ३.८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मदत दिली आहे, असं बागची म्हणाले.

दरम्यान, काही आंदोलक हे अद्यापही त्रस्त असून ते जीम करत आहेत. तर काही लोकं हे स्वीमिंग पूलमध्ये पोहत आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या जीमचा पूरेपूर वापर हे आंदोलक करत आहेत. म्हणजेच एकंदरीत पाहता तालिबानी लोकांनी ज्या प्रकारे अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. तशाचं प्रकारचे दृश्य हे श्रीलंकेमध्ये पहायला मिळत आहेत.


हेही वाचा : श्रीलंकेत आर्थिक संकट, मदतीसाठी ‘या’ देशांनी घेतला पुढाकार