घरदेश-विदेशPrashant Kishor : जो भाजपमध्ये जातो तो...केजरीवालांच्या अटकेवर प्रशांत किशोर काय म्हणाले...

Prashant Kishor : जो भाजपमध्ये जातो तो…केजरीवालांच्या अटकेवर प्रशांत किशोर काय म्हणाले पाहा

Subscribe

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी रात्री अटक केली. त्याआधी दोन तास त्यांची चौकशी करण्यात आली. आणि चौकशीअंती त्यांना अटक झाली. दिल्ली कथित मद्य घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई झाली आहे. ईडीच्या या कारवाईवरुन चांगल्याच उलटसुलट प्रतिक्रिया रंगत आहेत. विरोधकांनी भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे. आम आदमी पक्षानेही शुक्रवारी अटकेविरोधात निदर्शने केली. या सगळ्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी या कारवाईवरुन भाजप आणि ED वर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा – IPL 2024 Opening Ceremony : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात ‘नव्या भारता’ची छाप

- Advertisement -

अशा प्रकारच्या कारवाईमुळे देशभरात यंत्रणांबाबत विशेषतः ईडीबाबत नकारात्मक प्रतिमा तयार झाल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. जो भाजपसोबत नाही, त्याच्यावर ईडी-सीबीआय छापे टाकते, असे अनेकांना वाटत आहे. ईडी-सीबीआयने त्यांचे काम केले पाहिजे. ज्याची चूक असेल त्याची योग्यरित्या चौकशी करून त्यांना शिक्षा देणे, यात गैर काही नाही. पण, एखाद्या व्यक्तीविरुद्ध तपास सुरू झाला आणि तो भाजपमध्ये गेला, तर त्याच्याविरोधातील चौकशी थांबते, असा जो संदेश जनतेत जातो आहे, तो चुकीचा आहे, असेही मत किशोर यांनी मांडले.

लालू यादव असोत, टीएमसी असोत, अरविंद केजरीवाल असोत किंवा इतर कुणीही असो. देशातील लोकांना या कारवाईची कोणतीही अडचण नाही. अडचण अशी आहे की, ज्या व्यक्तीविरोधात तपास सुरू असतो, तोच जर भाजपमध्ये गेला तर तो संत होतो. लोकांना या गोष्टीची अडचण आहे. कालपर्यंत कायद्याच्या नजरेत चूक ठरलेला, दोषी असणारा भाजपमध्ये गेल्यावर शुद्ध होतो. म्हणूनच लोक भाजपला वॉशिंग मशीन म्हणतात. तपास यंत्रणेचा वापर फक्त विरोधकांना घाबरवण्यासाठी केला जातोय का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने न्यायालयात 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू कोर्टात केजरीवाल यांना हजर करण्यात आलं होतं. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना काल, गुरुवारी दोन तासांच्या चौकशीअंती ईडीने अटक केली.

हेही वाचा –Nana Patole : वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -