घरदेश-विदेशयुक्रेनमधील युद्धादरम्यान आकाशात काही तरी चमकले! लोकांमध्ये भीती; काय आहे प्रकरण?

युक्रेनमधील युद्धादरम्यान आकाशात काही तरी चमकले! लोकांमध्ये भीती; काय आहे प्रकरण?

Subscribe

नवी दिल्ली : युक्रेन आणि रूसमध्ये गेला वर्षभर युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान युक्रेनची राजधानी कीवमध्ये रात्रीच्या वेळी आकाशात लख्ख प्रकाश पडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र कीव मिलिटरी अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख सेर्गी पोप्को यांनी सांगितले की, बुधवारी (19 एप्रिल) युक्रेनची राजधानी कीवमध्ये आकाशातील तेजस्वी प्रकाश हा ‘हवाई हल्ल्याचा इशारा’ नव्हता, तर नासाच्या उपग्रहाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यामुळे हा लख्ख प्रकाश पडला होता. (The bright light was caused by a NASA satellite entering the Earth’s atmosphere)

सर्जी पोप्को यांनी सांगितले की, रात्री 10 वाजता (1900 GMT) कीवच्या आकाशात “तेजस्वी प्रकाश” दिसल्यानंतर युक्रेन सैन्याने हवाई हल्ल्याची तयारी केली होती, परंतु हवाई संरक्षण ऑपरेशन सुरू केले नाही. यानंतर थोड्याच वेळात युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले की, लख्ख प्रकाश “उपग्रह किंवा उल्का पडण्याशी संबंधित आहे.” अनेक न्यूज चॅनेलने आकाशात दिसणाऱ्या लख्ख प्रकाशाचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर युक्रेनियन सोशल मीडियावर अनुमान लावले गेले आणि मीम्सचा महापूर आला आहे. त्यामुळे हवाई दलाने एक निवेदन जारी करताना म्हटले की, “कृपया सोशल मीडियावर UFO मीम्स तयार करण्यासाठी अधिकृत हवाई दलाचे चिन्ह वापरू नका!”

- Advertisement -

नासाने आधीच दिली होती माहिती
या लख्ख प्रकाशाबाबत यूएस स्पेस एजन्सीने या आठवड्याच्या सुरुवातीला माहीत दिली होती. त्यांनी सांगितले होते की, 660-पाऊंड (300-किलोग्राम) उपग्रह बुधवारी कधीतरी वातावरणात पुन्हा प्रवेश करेल आणि जळून जाईल. पण काही घटक जिवंत राहण्याची अपेक्षा आहे. नासाने असेही स्पष्ट केले होते की, या उपग्रहामुळे पृथ्वीवरील कोणालाही हानी पोहोचण्याचा धोका अत्यंत कमी आहे.”
NASA ने सांगितले की, RHESSI या उपग्रहाची अवकाशाच्या कक्षेत राहण्याची वेळ संपली आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत 2002 मध्ये सोडण्यात आला होता आणि 2018 मध्ये बंद करण्यात आला होता. या अंतराळयानाचा वापर सौर ज्वाळांचे निरीक्षण करण्यासाठी वापरले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -