घरCORONA UPDATEकोरोनाने माणुसकी संपवली...चंद्रपूरमध्ये आईने पोटच्या मुलालाच नाकारलं!

कोरोनाने माणुसकी संपवली…चंद्रपूरमध्ये आईने पोटच्या मुलालाच नाकारलं!

Subscribe

कोरोना परिणाम माणसाच्या नात्यावरही झाल्याचं दिसून येत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सगळे सध्या घरातच बसून आहेत. मात्र हातावर पोट असणाऱ्यांनी मात्र गावची वाट धरली आहे. लॉकडाऊन जाहीर होताच लोक गावंकडे चालत निघाली. रोजगाराअभावी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील औरंगाबादला गेलेले एक कुटुंब आपल्या गावी परतले,  कोरोनाच्या भीतीमुळे सख्या आईने आपल्या मुलाला व सुनेला  घरातच घेतले नाही आणि ग्रामपंचायतीनेही जागा दिली नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंदपीपुरी तहसीलच्या तारसा गावात ही घटना घडली आहे. या घडनेनंतर कोरोनाच्या भीतीपोटी आता माणुस माणुसकी विसरला असच म्हणावं लागेल.

तारसा हे चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले एक छोटेसे गाव. या गावात रोजगार नसल्यामुळे गावातील एक तरुण कामाच्या शोधात औरंगाबादला गेला. औरंगाबादमध्ये आणि लहान मुलगी आणि पत्नी सिगंधाबरोबर तो रहात होता. पण देशावर आलेल्या अचानक संकटामुळे देशात ल़ॉकडाऊनची सुरूवात झाली. त्यामुळे त्याच्या हातचे काम गेलं. त्यामुळे त्यांने पुन्हा गावी येण्याचा निर्णय घेतला. पण कोरोनाच्या भीतीने आईने मुलाला आणि सुनेला घरात नेण्यास नकार दिला.

- Advertisement -

आईनेही नाकारले म्हटल्यावर मुलाने ग्रामपंचायतीकडे धाव घेतली. कोणताही मार्ग न पाहता मुलाने ग्रामपंचायतीला स्वत: ला अलग ठेवण्यासाठी जागा देण्याची विनंती केली. पण ग्रामपंचायतीनेही त्याला पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यामुळे तब्बल तीन तास हा मुलगा आपल्या बायको आणि मुलीला घेऊन ग्रामपंचायतीच्या शाळेसमोर पडून होता. या घटनेची माहिती कुणीतरी पोलिसांना दिली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ग्रामपंचायतीने तीन तासांनंतर शाळा उघडली आणि त्यांची व्यवस्था केली. त्यानंतर त्या मुलाच्या आईने स्वत: जेवणाचा डबा घेऊन पोहचली.


हे ही वाचा – Lockdown – कोरोनाच्या भितीमुळे १६०० किमी चालत आलेल्या मुलाला आईनं घराबाहेरच ठेवलं!!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -