घरCORONA UPDATECoronavirus Lockdown: मुलाचा इंग्लंडमध्ये मृत्यू; पालक पुण्यात लॉकडाऊन

Coronavirus Lockdown: मुलाचा इंग्लंडमध्ये मृत्यू; पालक पुण्यात लॉकडाऊन

Subscribe

कोरोना व्हायरसच्य संक्रमणामुळे संपुर्ण लॉकडाऊन झालेले आहे. या परिस्थितीत अनेकांना आपल्या जवळच्या लोकांच्या सुख-दुःखातही सहभागी होता येत नाही. सिद्धार्थ मुरकुंबी हा २३ वर्षीय युवक इंग्लंडमध्ये मृत्यू पावला आहे. त्याचे पालक पुण्यात लॉकडाऊन आहेत. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या पालकांनी आपल्या मुलाचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह पुण्यात पाठवावा, अशी मागणी केली आहे. इंडिया टुडे या संकेतस्थळाने याबाबत माहिती दिली आहे.

सिद्धार्थ मुरकुंबी हा युकेमधील सेंट्रल लॅन्सशायर विद्यापीठात शिक्षण घेत असून तो १५ मार्च पासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह पोलिसांना बँक ऑफ रिव्हर येथे आढळून आला आहे. आपल्या मुलाचे अंत्यसंस्कार करायचे असून त्याच्या आईला शेवटची मिठी मारायची आहे, त्यामुळे युके सरकारने पार्थिव भारतात पाठवावे, अशी कळकळीची मागणी कुरकुंबे कुटुंबियांनी केली.

- Advertisement -

शंकर मुरकुंबी (५७ वय) म्हणाले की, आमच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रवासबंदी असल्यामुळे आम्ही युकेला जाऊ शकत नाही. पण आम्हाला त्याची शेवटची झलक पाहायची आहे. दुसरीकडे सिद्धार्थने आत्महत्या केल्याचा अंदाज तेथील पोलिसांनी व्यक्त केला आहे. शंकर यांनी सांगितले की, आमच्या मुलाचा मृतदेह बँक ऑफ रिव्हरमध्ये सापडल्याचे पोलिसांनी फोन करुन सांगितले. तसेच सध्या त्याचा मृतदेह रोयल प्रिस्ट हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे.

रॉयल प्रिस्टन हॉस्टिपलमधील कोरोनरने (मृत्यू प्रकरणात चौकशी करणारा अधिकारी) शंकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना युकेमध्ये येऊन चौकशीस हजर राहण्याबाबत विचारणा केली. मात्र लॉकडाऊनमुळे पेपरवर्क, तसेच इतर प्रक्रिया पुर्ण करता येणार नसल्याचे कुटुंबाने कळविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -