घरCORONA UPDATEलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या वडिलांविरोधात मुलाने केली पोलिसांत तक्रार

लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या वडिलांविरोधात मुलाने केली पोलिसांत तक्रार

Subscribe

राजधानी दिल्लीत एका मुलाने आपल्या वडिलांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. मुलगा म्हणतो की त्याचे वडील लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत नाहीत आणि घराबाहेर जात आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीमध्येही कलम १४४ लागू आहे. दिल्लीमध्ये मुलाने आपल्या वडिलांविरूद्ध लॉकडाऊनचं उल्लंघन करत असल्यामुळे एफआयआर दाखल केली आहे. दक्षिण पश्चिम दिल्लीत एका मुलाने वडिलांनी लॉकडाऊनचं पालन न केल्यामुळे वडिलांविरूद्ध पोलिसांत तक्रार दिली. वसंत कुंज दक्षिण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मुलाने असं सांगितलं आहे की, त्याचे वडील दररोज सकाळी ८ वाजता घराबाहेर पडतात. अनेक वेळा समजावून सांगूनही ते घरात राहत नाहीत. मी सतत वडिलांना कोरोना विषाणूच्याबाबतीत, लॉकडाऊनच्या नियमांविषयी माहिती देत ​​असतो, परंतु वडील त्याकडे वारंवार दुर्लक्ष करीत आहेत, असं या युवकाचे म्हणणं आहे.


हेही वाचा – साक्षी महाराजांचा ‘कोरोना महामारी भगाओ’ यज्ञ; कोरोनाचा नाश होईल असा दावा

- Advertisement -

या तक्रारीवरुन पोलिसांनी कारवाई केली आणि ५९ वर्षीय व्यक्तीला समजावण्यासाठी स्वत: पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी त्यांना समजावून सांगितले की सध्या कलम १४४ लागू आहे आणि लॉकडाऊनदेखील आहे. त्यामुळे कोणालाही बाहेर पडण्याची परवानगी नाही. परंतु पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतरही तरुणाचे वडील ऐकत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला.

पोलिस बंदोबस्ताचे उल्लंघन केल्याबद्दल देशाच्या विविध भागांतून पोलिस कारवाईचे चित्र समोर येत आहे. बर्‍याच राज्यांतही पोलिसांनी कारवाई केली. कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. तर काही ठिकाणी पोलिसांनी उल्लंघन करणार्‍यांना रस्त्यावरच शिक्षा केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -