विकृत मुलाने केली वडिलांची निर्घृण हत्या

फोन काढून घेतल्याने मुलाला राग आवरला नसल्याने मुलानं केली वडिलांची हत्या

बेळगाव येथील काकतीमध्ये सोमवारी धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याने चक्क मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे पाच वाजता सिद्धेश्वर नगर ,काकती याठिकाणी घडली. ज्या मुलाने वडिलांची हत्या केली त्याचे नाव रघुवीर कुंभार असे आहे.

असा घडला प्रकार

रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळत असल्याने वडिलांनी आपल्या मुलाला मोबाईल ठेवण्यास सांगितले आणि त्याच्या हातातील मोबाईल फोन काढून घेतला. फोन काढून घेतल्याने मुलाला राग आवरला नाही. त्यामुळे राग व्यक्त करण्याकरिता संतापलेल्या मुलाने आजूबाजूच्या घरावर दगडफेक करून घरांच्या काचा फोडल्या. ही संपुर्ण घटना शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवली. यानंतर पोलिसांनी रघुवीर आणि त्याच्या पालकांना समज दिली. वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याचा राग डोक्यात ठेऊन रघुवीर रात्री झोपला होता. रघुवीर उठल्यानंतर त्याने घरात असणाऱ्या आपल्या वडिलांची विळी घेऊन हत्या केली. मुलाने हत्या केल्य़ानंतर वडिलांचे अवयव देखील कापले.

पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी रघुवीरला अटक केले. त्यानंतर त्याने पोलिसांना असे सांगितले की, मला वडिलांच्या मृतदेहाचे आणखी तुकडे करायचे होते असे सांगितले.

हा मुलगा तीन वेळा डिप्लोमा परीक्षेत नापास झाल्याने कुठेही नोकरी करत नव्हता. च्या वडिलांचं नाव शंकर देवाप्पा कुंभार असं असून ते जिल्हा सशस्त्र दलात पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते.