घरदेश-विदेशसोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाला वेगळी कलाटणी, गोवा पोलिसांनी दोन जणांवर केला हत्येचा...

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाला वेगळी कलाटणी, गोवा पोलिसांनी दोन जणांवर केला हत्येचा गुन्हा दाखल

Subscribe

सोनाली फोगाट यांच्या कुटुंबियांनी केलेली तक्रार आणि घडलेल्या सर्व प्रकरणावरून गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणाबाबत त्यांचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

सोनाली फोगाट यांचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर वर गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गोवा पोलिसांना याची पडताळणी केली असून सोनाली फोगाट यांचे शवविच्छेदणाची प्रक्रिया देखील पूर्ण झाली असून याचे रिपोर्ट देखील आता समोर आले आहेत. शवविच्छेदनाच्या अवहालामध्ये सोनाली यांच्या शरीरावर जखम झाल्याचे खूण दिसत आहे. ह्या जखमा खोल असून त्या स्पष्टपणे दिसत आहेत.शवविच्छेदनाच्या अवहालानुसार सोनाली फोगाट यांना विषारी पदार्थांच्या माध्यमातून देथील मारण्याचा प्रयत्न केला असावा.

सोनाली फोगाट यांच्या कुटुंबियांनी केलेली तक्रार आणि घडलेल्या सर्व प्रकरणावरून गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणाबाबत त्यांचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, समोर आलेल्या शवविच्छेदन अवहाल येण्यासाठी काही तासांचा अवधी लागू शकतो, परंतु शवविच्छेदनाच्या अवहालानुसार सोनाली यांच्या शरीरामध्ये आपत्तीजनक तत्व मिळाले आहेत. ज्यामुळे त्यांचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याचं समोर आलं आहे. याच्याच आधारावरून गोवा पोलिसांनी या प्रकरणी पीए सुधीर आणि सुखविंदर विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

सोनाली फोगाटचा टिकटॉक स्टार ते राजकारण प्रवास
सोनाली फोगट या टिकटॉक स्टार होत्या. तसंच, त्यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. टीकटॉकवरील त्यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामुळे सोशल मीडियावर त्या नेहमी चर्चेत असायच्या. तसेच, बिग बॉस शोच्या १४ व्या पर्वातही त्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, त्यांनी हरियाणातूनही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर, हरियाणातील महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भाजपाने त्यांची नियुक्ती केली.


हेही वाचा :टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांंचं निधन

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -