Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश वास्तवातील '3 Idiots' मधील 'फुंशुक बांगड़ू' यांचा सैंनिकांसाठी नवा प्रयोग

वास्तवातील ‘3 Idiots’ मधील ‘फुंशुक बांगड़ू’ यांचा सैंनिकांसाठी नवा प्रयोग

थंडीपासून बचावासाठी टेंट तयार केले.

Related Story

- Advertisement -

राजकुमार हिराणीकृत लोकप्रिय चित्रपट ‘थ्री इडियट्स’ यामध्ये अमिर खान याने फुंशुक बांगडू याची व्यक्तिरेखा साकारली. ज्या व्यक्तिकडून अमिर खान याने फुंशुक बांगडू या भूमिकेसाठी प्रेरणा घेतली होती. ती व्यक्ती लडाखमधील सोनम वांगचूक ही आहे. ज्यांची लडाखमध्ये शाळा आहे. ही व्यक्ति सतत जगावेगळे प्रयोग करीत असते.असाच नवा प्रयोग त्याने टेंट बनवण्यासाठी केला. त्याने लडाखमधील सैनिकांचे कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी टेंट तयार केला असून, याबाबत त्याने ट्विट् केले आहे.

- Advertisement -

लडाखच्या उंच शिखरांवर हाडं गोठवणारी थंडी असते. त्यासाठी फुंशुक बांगडू याने टेंट तयार केले आहेत. या टेंटमध्ये लाकूड अथवा रॉकेलचा वापर न करता सौरऊर्जेचा वापर करायचा आहे. जेणेकरुन टेंटमध्ये उष्णता निर्माण होईल. यामध्ये इंधनाची गरज नसल्याने प्रदूषण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ३० किलोच्या या टेंटमध्ये १० सैनिक यामध्ये राहू शकतात. जेव्हा बाहेरचे तापमान मायनस २० डिग्री असते, तेव्हा आतील तापमान २० डिग्री असते. गलवान वॅली मध्ये रात्री १० वाजता बाहेरील तापमान -१४°C होते, तर टेंटमधील तापमान +१५°C इतके असते.

वास्तवातील फुंशुक बांगडू नक्की कोण आहेत

१९८७ मध्ये त्यांनी श्रीनगरमधील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये बी. टेक्. पदवी घेतली. नंतर फ्रान्समध्ये जाऊन मातीच्या बांधकामांचे धडे घेतले. वांगचुक यांनी ‘ऑपरेशन न्यू होप’ हा शैक्षणिक कार्यक्रम राबवला. सौरशक्तीवर चालणाऱ्या शाळा वांगचुक यांनी पर्यावरणस्नेही पद्धतीने तयार केल्या. उणे तीस अंश तापमानात लडाख, नेपाळ व सिक्किममध्ये त्यांनी सुरू केलेल्या शाळा उबदार राहू लागल्या. आपल्या बुद्घीचा वापर करत त्यांनी विज्ञान जगतात नवे अविष्कार केले. मात्र ‘थ्री इडियट्स’ मधील पात्र ‘फुंशुक वांगडू’ याच्याशी केलेली तुलना वांगचुक नाकारतात.


- Advertisement -

हेही वाचा – एकनाथ खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना, शास्त्रज्ञांनी संशोधन केलं पाहिजे- गिरीश महाजनांचा टोला

- Advertisement -