घरदेश-विदेशभारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सोनिया गांधींचाही सहभाग

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सोनिया गांधींचाही सहभाग

Subscribe

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपशासित असलेल्या कर्नाटक राज्यातील मांड्या या जिल्ह्यामधून पहिल्यांदा भारत जोडो यात्रेत भाग घेतला आहे. दरम्यान या यात्रेत सोनिया गांधी यांच्या सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे सुद्धा या पदयात्रेत सहभागी झाले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो यात्रे’वर आहेत. 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेला ‘भारत जोडो यात्रेचा’ प्रवास आता केरळवरून कर्नाटक राज्यात पोहोचला आहे. दरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुद्धा गुरुवारी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांसोबत पायी चालत प्रवास केला. दरम्यान ही पदयात्रा कर्नाटकात 21 दिवस प्रवास करणार आहे. ही यात्रा एकूण 511 किलोमीटर अंतराचा प्रवास करणार आहे. कर्नाटकात ही यात्रा चामराजनगर, म्हैसूर, मांड्या, तुमाकुरू, चित्रदुर्ग, बेल्लारी आणि रायचूर जिल्ह्यांमधून जाणार आहे.

 

- Advertisement -

मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सोनिया गांधींच्या पदयात्रेत सहभाग

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपशासित असलेल्या कर्नाटक राज्यातील मांड्या या जिल्ह्यामधून पहिल्यांदा भारत जोडो यात्रेत भाग घेतला आहे. दरम्यान या यात्रेत सोनिया गांधी यांच्या सोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे सुद्धा या पदयात्रेत सहभागी झाले. काँग्रेस अध्यक्षांच्या यादीत असलेल्या प्रमुख दावेदारांपैकी मल्लिकार्जुन खर्गे एक आहेत.

- Advertisement -

 

पदयात्रेच्या 26व्या दिवशी सोनिया गांधी झाल्या सहभागी

दरम्यान मागच्या बऱ्याच काळापासून सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा उपक्रमात भाग घेतला नव्हता. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर या पाच महिन्यांच्या भारत जोडो यात्रेच्या 26व्या दिवशी सोनिया गांधींनी यात्रेत सभाग घेतला. दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यासुद्धा 7 ऑक्टोबर रोजी या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

कर्नाटकातील गुंडलुपेट येथून राज्यातील प्रवास सुरू झाला

मागील महिन्यात कन्याकुमारी येथून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. यात्रेला सुरुवात केल्यापासूनच राहुल गांधी सतत पायी प्रवास करत आहेत. 30 सप्टेंबर रोजी केरळ येथून सुरु झालेला यात्रेचा हा प्रवास गुंडलुपेट जिल्ह्यातून कर्नाटक राज्यातील यात्रेला सुरुवात झाली आहे.

भाजपशासित राज्यातून भारत जोडो यात्रेला सुरुवात

राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. 2024 च्या निवडणुकीदरम्यान पक्षबांधणीला या यंत्रतेपासून सुरुवात झाली. दरंयान देशातील ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे. अशा राज्यांमधून राहुल गांशी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आहे. कर्नाटकात सुद्धा भाजाचीच सत्ता आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेने कर्नाटकात प्रवेश केल्याने ही यात्रा आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. दरम्यान पुढल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. ही यात्रा पहिल्यांदाच भाजपशासित राज्यातून जात आहे. यापूर्वी ही यात्रा तामिळनाडू आणि केरळमधून प्रवास करत होती, जिथे भाजपचे सरकार नाही. विशेष म्हणजे, कन्याकुमारी ते श्रीनगर या 3,570 किलोमीटर लांबीच्या यात्रेत 5 महिन्यांच्या कालावधीत 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल.


हे ही वाचा – वाघ तो वाघच, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून मनसेने केले राज ठाकरेंचे कौतुक

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -