आपण नेहरु, सोनिया गांधींच्या नावे खूप पैसा कमावला, आता…; काँग्रेस नेत्यांचे वादग्रस्त विधान

काँग्रेस पक्षाच्या 60 वर्षांच्या लूट इंडिया कार्यक्रमाचे एवढ्या चांगल्याप्रकारे वर्णन करणाऱ्या प्रभावशाली नेत्याचे अभिनंदन म्हणत भाजपने देखील निशाणा साधला आहे

sonia gandhi ed inquiry congress leader ramesh kumar says we made money in name of neharu indira gandhi

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गुरुवारी ईडीने चौकशी केली. जवळपास 3 तास ही चौकशी सुरु होती. ईडीच्या या कारवाईविरोधात काल काँग्रेसने देशव्यापी आंदोलन पुकारले होते. या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केआर रमेश कुमार यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्या नावे आजवर आपण चार पिढ्या बसून खातील इतका पैसा कमावला आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि सोनिया गांधी अडचणीत असताना त्यांच्यासाठी एवढाही त्याग करु शकत नाही का? हे चांगलं वाटत नाही, असं वादग्रस्त विधान कर्नाटक काँग्रेसचे आमदार रमेश कुमार यांनी केले आहे.

हेही वाचा : मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आरपारची लढाई लढू; नाना पटोलेंचा इशारा

रमेश कुमार पुढे म्हणाले की, आपण जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावे कमावलेली संपत्ती आपल्या चार पिढ्या बसून खाऊ शकतात. पण आज आपण त्यांच्यासाठीच बलिदान दिले नाही तर भविष्यात आपल्या अन्नाची नासाडी होईल. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी छोटे- छोटे मुद्दे बाजूला ठेवत सोनिया गांधींना मजबूत पाठिंबा देण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काल काँग्रसेने देशभरात आंदोलन केले. दिल्ली, महाराष्ट्र, जम्मू काश्मीरमधील अनेक काँग्रेस कार्यकर्ते ईडीविरोधात रस्त्यावर उतरले होते. दरम्यान कर्नाटकातूनही अनेक काँग्रेस नेत्यांनी ईडीच्या कारवाईला विरोध दर्शवला. यावेळी अनेक आक्रमक काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, दरम्यान संसदेच्या बाहेर देखील काँग्रेस खासदारांनी ईडीविरोधात शांततेत आंदोलन केले. दोन तासांच्या चौकशीनंतर अखेर त्यांना सोडण्यात आले, यानंतर 25 जुलै रोजी ईडीने त्यांना पुन्हा चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत.

हेही वाचा : ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक; दिल्लीसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन

काँग्रेस कोणत्या तोंडाने मत मागत; भाजपचे टीकास्त्र

काँग्रेस नेत्याच्या वादग्रस्त विधानानंतर आता भाजपने देखील निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षाच्या 60 वर्षांच्या लूट इंडिया कार्यक्रमाचे एवढ्या चांगल्याप्रकारे वर्णन करणाऱ्या प्रभावशाली नेत्याचे अभिनंदन. काँग्रेस नेत्याने एवढ्या इमानदारीत भ्रष्टाचार केल्याचे स्वीकार केल्यानंतरही कोणत्या तोंडाने हे जनतेकडून मत मागत आहेत? असा शब्दात भाजप कर्नाकटचे आरोग्य मंत्री आणि भाजप नेते सुधाकर के. यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर देखील त्यांनी रमेश कुमार यांच्या वादग्रस्त वक्तव्याची क्लिप शेअर करत काँग्रेसवर टीकास्त्र डागले आहे.


हेही वाचा : विमानात बॉम्ब असल्याचा प्रवाशाचा दावा; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपासणीवेळी आले सत्य समोर