सोनिया गांधींची प्रकृती खालावली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल

Sonia Gandhi hospitalized due to corona
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी

सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयातमध्ये सोनिया गांधी यांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. 1 जून रोजी संध्याकाळी सोनिया गांधी यांना ताप आला होता. तापाची हलकी लक्षणे समोर आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याच स्पष्ट झाले होते.

उपचार सुरु –

कोरोनामुळेच त्यांची प्रकृती खालावली आहे. त्या नंतर पुढील उपचारासाठी त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरु आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

 

ईडी कार्यालयात 3 तारखेला हजर राहण्याचे आदेश –

8 जून रोजी ईडीने सोनिया गांधी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी नवी तारीख द्यावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर ईडीने नवी नोटीस पाठवत सोनिया गांधी यांना 23 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश जारी केले होते. दरम्यान, आता पुन्हा सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्यामुळे 23 तारखेला तरी त्या चौकशीसाठी हजर राहतात का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.