सोनिया गांधीना पोस्ट कोवीड समस्यांबरोबर श्वसननलिकेत संसर्ग, प्रकृती स्थिर

सोनिया गांधीना श्वसननलिकेत संसर्ग झाला असून दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

Sonia Gandhi will not attend EDs inquiry

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरी त्यांना पोस्ट कोवीड समस्या उद्भवल्या आहेत. त्यांच्या श्वसननलिकेत संसर्ग झाला असून दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. काँग्रेसने सोनिया यांच्या प्रकृतीची माहिती देणारे पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

नाकातून रक्तस्त्राव

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना १२ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यादरम्यान सोनिया यांच्या श्वसननलिकेत बुरशीजन्य विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून कोरोनानंतर होणाऱ्या पोस्ट कोवीड आजारांवरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे या पत्रकात सांगण्यात आले आहे.

२ जून रोजी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. पण सौम्य लक्षणे असल्याने त्या घरातच विलगीकरणात होत्या.डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण कोरोना मुक्त झाल्यानंतर त्यांना पोस्ट कोवीड समस्या उद्भवल्या. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना १२ जून रोजी गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांची देखभाल करण्यासाठी राहुल गांधीही रुग्णालयात थांबले आहेत. डॉक्टरांचे एक पथक सोनियांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे.

२३ जूनला मनी लॉड्रींगप्रकरणीसब  सोनिया गांधी यांना ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. ईडीने त्यांना समन पाठवले आहे. तर याचप्रकरणी ईडीने राहूल गांधी यांची चौकशी सुरू केली आहे.