घर देश-विदेश संसदेच्या विशेष अधिवेशनावरून सोनिया गांधीचं पंतप्रधानांना पत्र; 'या' मुद्द्यावर वेधलं लक्ष

संसदेच्या विशेष अधिवेशनावरून सोनिया गांधीचं पंतप्रधानांना पत्र; ‘या’ मुद्द्यावर वेधलं लक्ष

Subscribe

सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभागृहात होणाऱ्या विशेष अधिवेशनाबाबत पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी विशेष अधिवेशनाचा विषय विरोधकांना माहीत नसण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेत विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. याआधी स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पहिले विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा जेव्हा विशेष अधिवेशन बोलावले जाते तेव्हा संसद काहीतरी मोठा निर्णय घेत असते. यावेळी मोदी सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात अनेक मोठ्या मुद्द्यांवर घोषणा होऊ शकतात. मात्र याच दरम्यान या विशेष अधिवेशनाच्या मुद्यावरून विरोधकांनी गदारोळ माजवला आहे. आता काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. (Sonia Gandhi s letter to Prime Minister Narendra Modi on Special Session of Parliament Attention was drawn to this issue )

पत्रात काय लिहिलंय?

संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी विरोधक केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. यासोबतच अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. यावेळी इंडिया आघाडीतील नेते सरकारला विचारत आहेत की, या विशेष अधिवेशनात सरकारचा अजेंडा काय असेल? एवढेच नाही तर, सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभागृहात होणाऱ्या विशेष अधिवेशनाबाबत पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी विशेष अधिवेशनाचा विषय विरोधकांना माहीत नसण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

सोनिया गांधींनी उपस्थित केलेले मुद्दे

  • जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, वाढती बेरोजगारी, वाढती असमानता आणि एमएसएमईचे संकट यावर लक्ष केंद्रित करणारी सद्य आर्थिक परिस्थिती
  • एमएसपीबाबत सरकारने शेतकरी आणि शेतकरी संघटनांना दिलेली आश्वासने
  • अदानी समूहावरील खुलाशांची चौकशी करण्यासाठी जे.पी.सी
  • मणिपूरमधील जनतेचे दु:ख आणि राज्यातील घटनात्मक यंत्रणा आणि सामाजिक सलोखा बिघडणे
  • हरियाणासारख्या राज्यात जातीय तणाव
  • लडाख-अरुणाचल प्रदेशातील सीमेवर चीनने भारतीय भूभागावर कब्जा करत आपल्या सार्वभौमत्वाला दिलेलं आव्हान
  • जात जनगणनेची नितांत गरज
  • केंद्र-राज्य संबंधांचे नुकसान
  • काही राज्यांमध्ये तीव्र पूर आणि काही राज्यांमध्ये दुष्काळ निर्माण करणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा परिणाम

या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा

सोनिया गांधी म्हणाल्या की, हे विशेष अधिवेशन घेण्यामागचा अजेंडा विरोधकांनाही सांगितलेला नाही. या बैठकीत सरकार महिला आरक्षण विधेयक, मणिपूर हिंसाचार, यूसीसी, एक देश एक कायदा यावर चर्चा करू शकते अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: उदयनिधी स्टॅलिन यांचा सनातन धर्मावर हल्ला सुरूच; आता राष्ट्रपती मूर्मूंचं नाव घेत म्हटलं… )

- Advertisment -