नवी दिल्ली : पाकिस्तानातून पब्जी गेमच्या माध्यमातून आलेली सीमा हैदर ज्याप्रकारे सचिनला सोडून पुन्हा पाकिस्तानात जाण्यास तयार नाही अगदी तसाच एक प्रकार आता पुन्हा समोर आला आहे. फक्त महिला आणि देश तेवढा वेगळा आहे. काय हा प्रकार वाचा तर मग सविस्तर. (Sonia, who has come from Bangladesh after the border, says that even if ten crores are paid…; Read-what is the matter)
सविस्तर वृत्त असे की, सीमा आणि सचिनची प्रेमकहाणी सध्या आपल्या देशात चांगलीच गाजत आहे. प्रसारमाध्यमांनी जेवढी जागा या दोघांना दिली त्यांनतर असे अनेक प्रकरणे जरा अती गतीनेच समोर येत आहेत. दरम्यान 24 ऑगस्ट रोजी असेच एक प्रकरण समोर आले. थेट बांगलादेशातून एक महिला भारतात तिच्या पतीला शोधण्यास आली असून, तिचे नाव सोनिया अख्तर आहे. ती तिचा पती सौरभकांत तिवारी यास शोधत असून, ती पुन्हा तिच्या मायदेशात परत जाण्यास तयार नाही. एवढेच काय तर 10 कोटी रुपये दिले तरी आपण पतीशिवाय परत जाणार नसल्याचे तिचे म्हणणे आहे. तेव्हा सचिन आणि सीमानंतर पुन्हा आता सोनिया-सौरभकांत हे प्रकरण चांगलेच गाजणार आहे.
2021 मध्ये लग्न झाल्याचा केला दावा
बांगलादेशातून भारतात आलेल्या सीमा अख्तरने दावा केला आहे की, सौरभकांत तिवारी यांनी आपल्यासोबत 2021 मध्ये विवाह केला होता. त्याने त्यावेळी सांगितले की, माझी पहिली पत्नी मेलेली आहे. मी विश्वास ठेवला आणि लग्ल केले. मात्र, जेव्हा मला त्याच्यापासून दिवस गेले तेव्हा त्याने माझी पहिली पत्नी जीवंत आहे असे सांगितल्याची माहिती सोनियाने दिली.
हेही वाचा : TRASH ON THE MOON : सवय ती सवयच… माणसांनी चंद्रालाही नाही सोडले; तेथे जाऊनही टाकला कचरा
थेट नोएडा गाठले सोनियाने
बांगलादेशातून आलेली सीमा अख्तर तिचा पती सौरभकांत तिवारी याला शोधण्यासाठी थेट नोएडा गेली असून, तिने सांगितले की, तिच्या पतीने लग्नानंतर आपण भारतात जातो आणि नंतर परत येतो असे म्हटले आणि तो गेला. तो गेला तसा परत न आल्याने आपण त्याला शोधण्यास आले असल्याचे तिचे म्हणणे आहे.
हेही वाचा : Mumbai Crime: खलबत्याने ठेचून पत्नीने केली पतीची हत्या; मीरारोडमधील घटनेमुळे खळबळ
सौरभने लावले सोनियावर आरोप
चौकशीदरम्यान सौरभने सांगितले की, तो बांगलादेशात कामासाठी गेला होता. तेथे त्याचे बळजबरीने धर्मांतर करून सोनियाशी लग्न केले. तिथून मला भारतात परत येऊ दिले जात नव्हते. कसातरी मी भारतात परतलो. मात्र, सौरभच्या आरोपावर सोनिया म्हणाली की, त्याने सांगितले की, त्याची पत्नी मरण पावली आहे आणि तिला धर्मांतर करून तिच्याशी लग्न करायचे आहे. त्यानंतर त्यांनी स्वेच्छेने मुस्लिम धर्म स्वीकारून विवाह केला.