घरताज्या घडामोडीसोनू सूदची राजकारण एंट्री ? 'आप' मधून लढणार निवडणूक ?

सोनू सूदची राजकारण एंट्री ? ‘आप’ मधून लढणार निवडणूक ?

Subscribe

संपुर्ण देशासाठी सोनू सूद हे इन्स्पिरेशन आहेत, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बॉलिवुड अभिनेता सोनू सूदचे कौतुक केले आहे. देशात कोणालाही कोणतीही अडचण असो, सोनू सूदकडून मदत मागितली जाते. देश के मेंटोर या कार्यक्रमासाठी सोनू सूद ब्रॅंड एम्बेसेडर झाल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. दिल्लीत या कार्यक्रमाचा प्रायोगिक तत्वावरील कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. देशात महामारीच्या काळात गरजूंना सेवा पोहचवत सोनू सूदने उल्लेखनीय काम केले असेही ते म्हणाले. राजकारणातील एंट्री, आपमधून आमदारकी अशा अनेक विषयांवर सोनू सूदने चौफेर फटकेबाजी केली.

- Advertisement -

देश के मेंटोरे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना करिअर गायडन्सच्या रूपातला हा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळेच आम्ही देशातील नागरिकांना आवाहन करतो की, या आणि देशातील मुलांचे मार्गदर्शन करा. अनेकदा मुलांना करिअर निवडताना तणावाचा सामना करावा लागतो. अशावेळी मार्गदर्शनामुळे मुलांचा हा ताण हलका होण्यासाठी मदत होते. आज शुक्रवारी सोनू सूद आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या उपक्रमाशी जोडण्याचे आवाहन केले. यावेळी सोनू सूद म्हणाले की, विकास तेव्हाच होईल जेव्हा शिक्षणाचा दर्जा उंचावेल. दिल्लीत शिक्षणाच्या दर्जात कोणत्या पद्धतीने बदल झाले आहेत, हे आता सांगायची गरज नाही अशी प्रतिक्रिया सोनू सूद यांनी दिली. माझे सर्वांना आवाहन आहे की, दिल्ली सरकारच्या या कार्यक्रमाचा भाग व्हा. आम्ही आज राजकारणावर चर्चा केली नाही, पण जी चर्चा झाली ती राजकारणापेक्षाही उच्च दर्जाची होती असेही ते म्हणाले.

देश के मेंटोरपेक्षा सध्याच्या घडीला कोणताही मुद्दा असू शकत नाही. लोकांना काही तरी चांगले काम करायचे असते, असे मला अनेकजण सांगतात. तेव्हा मी सांगतो की राजकारणात या, राजकारणात येऊन चांगले कामही करू शकता. राजकारण हे खूपच कमालीचे क्षेत्र आहे. पण आज आम्ही राजकारणावर बोललो नाही. कारण राजकारणापेक्षाही देश के मेंटोर हा मोठा मुद्दा आहे. अरविंद केजरीवाल यांनीही यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. पण त्याचवेळी सोनू सूद यांच्या कामाचे कौतुक केले.

- Advertisement -

राजकारणात प्रवेश करणार हा असाही सवाल सोनू सूदला यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी सोनू सूदने मात्र स्पष्ट केले आज कोणतीही चर्चा ही राजकारणावर झालेली नाही. आपमधून निवडणुक लढवणार का ? असाही सवाल केल्यावर अतिशय चतुराईने सोनू सूदने या विषयाला उत्तर दिले. राजकीय विषयावर आज आमच्यात चर्चा झालेली नाही. पण राजकारणापेक्षाही मोठ्या गोष्टीवर देश के मेंटोरच्या निमित्ताने चर्चा झाली. त्यामुळे राजकारणापेक्षाही हा मोठा विषय असल्याचे सोनून सूदने यावेळी चतुराईने सांगितले. आपमधून आमदारकीला उभे राहणार का ? या प्रश्नाचे उत्तरही सोनू सूदने अतिशय चतुराईने टाळले. आज कोणत्याही प्रकारची राजकारणावर चर्चा झाली नाही, असे उत्तर सोनू सूदने दिले.


हे ही वाचा – बिग बींच्या सुरक्षेतील हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेची बदली, वर्षाला मिळत होता 1.5 कोटी पगार !


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -