घरदेश-विदेशकमलनाथ सरकारने किती शेतकऱ्यांची कर्जमाफी केली? KBC मधील व्हायरल व्हिडिओचे सत्य आले...

कमलनाथ सरकारने किती शेतकऱ्यांची कर्जमाफी केली? KBC मधील व्हायरल व्हिडिओचे सत्य आले बाहेर

Subscribe

'आम्हाला आमच्या शो कौन बनेगा करोडपतीच्या व्हिडिओशी छेडछाड झाल्याची माहिती मिळाली आहे. या व्हिडिओमध्ये, होस्ट आणि स्पर्धकांच्या मूळ आवाजांवर बनावट आवाज चढवले गेले आहेत. अशा चुकीच्या माहितीचा आम्ही तीव्र निषेध करतो.

मुंबई:’कौन बनेगा करोडपती’ हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. ‘केबीसी’ सीझन 15 ला खूप पसंत केले जात आहे. या शोच्या मंचावरून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी संबंधित प्रश्न विचारला जात आहे. व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर एक स्पर्धक बसलेला दिसत आहे. ते त्या स्पर्धकाला विचारतात की 2018 मध्ये मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारने किती शेतकऱ्यांची कर्जे माफ केली होती. व्हिडिओ समोर आल्यानंतर सोनी टीव्हीने एक निवेदन जारी करुन सत्य काय आहे ते सांगितलं आहे. (Sony Tv Kamal Nath government waived off the loans of how many farmers The truth about the viral video from KBC Amitabh Bachchan is out)

व्हिडिओ शेअर करू नका

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजननेही हे प्रकरण सायबर क्राइम सेलच्या मदतीने तपासले जात असल्याचे उघड केले आहे. चॅनलने आपल्या निवेदनात लिहिले की, ‘आम्हाला आमच्या शो कौन बनेगा करोडपतीच्या व्हिडिओशी छेडछाड झाल्याची माहिती मिळाली आहे. या व्हिडिओमध्ये, होस्ट आणि स्पर्धकांच्या मूळ आवाजांवर बनावट आवाज चढवले गेले आहेत. अशा चुकीच्या माहितीचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही सायबर क्राईम सेलकडे या प्रकरणाचा सक्रियपणे तपास करत आहोत. तसेच दर्शकांना चुकीचा व्हिडीओ शेअर करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -

याआधी गुरुवारी सोनी टीव्हीने बनावट व्हिडिओसह मूळ व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला होता. तसेच सांगितले की, ‘आमच्या कौन बनेगा करोडपती शोच्या क्लिपमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. वस्तुस्थिती- मूळ व्हिडिओसाठी खालील लिंक पहा.

फेक व्हिडिओमध्ये अमिताभ काय विचारत आहेत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन प्रश्न विचारतात, ‘मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारने 2018 मध्ये किती शेतकऱ्यांची कर्जे माफ केली होती? पर्याय होते- A. 2 लाख, B- 27 लाख, C- 5 लाख आणि D- 10 लाख. स्पर्धकाने बी उत्तर दिले होते, त्यानंतर अमिताभ सांगतात की हेच बरोबर उत्तर आहे.

- Advertisement -

यापूर्वीही व्हिडिओ झाला होता व्हायरल

व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिल्यास, अमिताभ बच्चन यांचे लिप सिंक आवाजाशी जुळत नसल्याचे सहज लक्षात येईल. असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ‘केबीसी’चा एक बनावट व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. अमिताभच्या बनावट व्हॉईसओव्हरमध्ये, ‘यापैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या बनावट घोषणांमुळे घोषणा मंत्री म्हणतात?’ हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे पर्याय होते. स्पर्धकाने शिवराज सिंह चौहान यांचे नाव घेतले आणि अमिताभ यांनी अचूक उत्तर जाहीर केले.

(हेही वाचा: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूची पुन्हा धमकी; दिला ‘असा’ इशारा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -