घरCORONA UPDATEमाफ करा... चुकून तुमच्या जमिनीचा ताबा मिळविला!

माफ करा… चुकून तुमच्या जमिनीचा ताबा मिळविला!

Subscribe

गेल्या महिनाभरापासून झेक रिपब्लिकच्या जमिनीवर पोलंडने ताबा मिळवल्याची माहिती समोर आली होती.

सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक देश या कोरोनाच्या संकटाशी लढत आहे. कोरोना संकटाचा सामना सुरू असतानाच एका देशाकडून अजब घटना घडली. पोलंडने आपले शेजारी राष्ट्र झेक रिपब्लिकच्या जमीनाचा ताबा मिळवला असल्याची कबुली दिली आहे. पोलंडच्या संरक्षण मंत्रालयाने चुकून आम्ही त्यांच्या राष्ट्राच्या जमिनीचा ताबा घेतल्याचे म्हटले आहे. गेल्या महिनाभरापासून झेक रिपब्लिकच्या जमिनीवर पोलंडने ताबा मिळवल्याची माहिती समोर आली होती. सीमेचे संरक्षण करणाऱ्या जवानांनी कोरोना व्हायरसला थांबवण्यासाठी काही पावले उचलली. त्यावेळी त्यांनी झेक रिपब्लिकमधील एका चॅपलवर ताबा मिळवला. तसेच ते काही दिवस त्या ठिकाणीही राहिल्याचे म्हटले जात आहे.

एवढेच नव्हे तर पोलंडच्या सैनिकांनी झेक रिपब्लिकहून येणाऱ्या लोकांनाही आत येऊ दिले नाही. त्यानंतर झेक रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांनी पोलंड सरकारशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. ही घटना झेक रिपब्लिकमधील शहर मोरावियामध्ये घडली. पोलंडच्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना चुकून ही घटना घडल्याचे म्हटले. तसेच झेक रिपब्लिकच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मात्र अद्याप यावर उत्तर देण्यात आले नाही.

- Advertisement -

पोलंड सैनिकांचा चॅपलवर ताबा

सर्व प्रथम ही घटना स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. दरम्यान, त्यावेळी चॅपलच्या डागडुजीचे काम करणारा एका अभियंत्याने जेव्हा त्या ठिकाणचा फोटो घेण्यास गेला, तेव्हा पोलंडच्या सैनिकांनी त्याला फोटो घेण्यापासून रोखले. तसेच चॅपलकडे जाणारा रस्ताही अडवण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक वृत्तपत्राने त्या ठिकाणी फोटोग्राफर पाठवून या घटनेची माहिती घेतली.

पाण्याचा प्रवाह दोन्ही देशांच्या सीमांना विभागतो

हे चॅपल झेक रिपब्लिकच्या सीमेच्या ३० किलोमीटर आत आहे. या ठिकाणी एक पाण्याचा प्रवाह दोन्ही देशांच्या सीमांना विभागतो. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम पोलंडचे सैनिक सुरूवातीला पोलंडच्या सीमेतच होते. परंतु नंतर त्यांनी झेक रिपब्लिकच्या सीमेत प्रवेश केला. दरम्यान, ते किती दिवस त्या ठिकाणी राहत होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -