घरदेश-विदेश"मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही''; एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची सुसाईड नोट लिहित...

“मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही”; एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची सुसाईड नोट लिहित आत्महत्या

Subscribe

एमबीबीएसच्या एका विद्यार्थिनीनं हाताची नस कापून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंदीगडमध्ये घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पीडित विद्यार्थिनीने सुसाईड नोट लिहिली होती. याप्ररकरणी पोलिसांनी त्या विद्यार्थिनीची सुसाईड नोट जप्त करत अधिक तपासाला सुरूवात केली आहे.

एमबीबीएसच्या एका विद्यार्थिनीनं हाताची नस कापून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंदीगडमध्ये घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पीडित विद्यार्थिनीने सुसाईड नोट लिहिली होती. याप्ररकरणी पोलिसांनी त्या विद्यार्थिनीची सुसाईड नोट जप्त करत अधिक तपासाला सुरूवात केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे.

तरूसीखा (२१) असं या पीडित विद्यार्थिनीचं नाव आहे. तरूसीखा ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (GMCH-32), सेक्टर-32 ची विद्यार्थिनी होती. तरूसीखाच्या उजव्या हाताची नसही कापली गेली. तरूसीखाने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती.

- Advertisement -

यामध्ये तिने “माफ करा आई आणि मोनू, मी येथून परत जाऊ शकत नाही म्हणून हे पाऊल उचलले आहे. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. ज्या लोकांचे पैसे द्यायचे, त्यांचे पैसे परत द्या. दूधवाल्याकडून एक हजार तर इतरांकडून पैसे घेतले होते. ज्या लोकांकडून तिने पैसे घेतले होते त्यांचा सामना करणे तिला शक्य नव्हते”, असं लिहीलं आहे. तसंच, या नोटमध्ये दूधवाल्याबाबत आणखी अनेकांची नावं लिहिण्यात आल्याचं समजतं.

तरूसीखा ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (GMCH-32), सेक्टर-32 ची विद्यार्थिनी होती. तरूसीखाच्या उजव्या हाताची नसही कापली गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तरूसीखाचे महाविद्यालयातील दुसरे सत्र सोमवारी सुरू झाले, तर पहिल्या दिवशी ती घरी एकटीच होती, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

- Advertisement -

तरुसीखाने शस्त्रक्रियेच्या चाकूने हाताची नस कापल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सीआरपीसी कलम १७४ अन्वये कारवाई केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


हेही वाचा – EMI वाढणार, SBI नंतर या बँकानी घेतला निर्णय, यातील तुमची बँक कोणती?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -