Covid Super Variant : दक्षिण आफ्रिकेत आढळला कोरोनाचा सुपर व्हेरिएंट, ३२ म्युटेशनमुळे वैज्ञानिकांमध्ये उडाली खळबळ

दक्षिण आफ्रिकेत कोविड-१९चा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यामुळे या देशात एकच खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेत मल्टिपल म्यूटेशनवाला कोविड व्हेरिएंट सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोविडच्या नव्या व्हेरिएंटमुळे त्यांनी WHOला तात्काळ मिटींग घेण्याची विनंती केली आहे. ३२ म्युटेशनमुळे वैज्ञानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या ही मल्टिपल म्यूटेशन आहे. बोत्सवाना आणि हॉंगकाँगमध्ये सुद्धा कोरोनाचे नवीन रूग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षात दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कोरोनाचा बीटा व्हेरिएंट आढळून आला होता. त्यानंतर तो संपूर्ण जगभरात पसरला.

वैज्ञानिकांनी WHOला केली बैठकीची मागणी

दक्षिण आफ्रिकेच्या वैज्ञानिकांनी B.1.1.529 व्हेरिएंटच्या प्रभावामुळे बैठकीची मागणी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिजीजने सांगितलं की, आमच्याकडे सध्या डेटा उपलब्ध आहे. नव्या व्हेरिएंटवर वैज्ञानिक सतत काम रिसर्च करत आहेत. गौटांग प्रांतामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या प्रांतामधून ९० टक्के B.1.1.1.529 ची लक्षणं समोर येत आहेत. दक्षिण आफ्रिकेत यंदाच्या वर्षात आणि व्हेरिएंट C.1.2 आढळून आला होता. परंतु तो इतका प्रभावी नव्हता.

एनआयसीडीचे प्राध्यापक एड्रियन पुरेन यांनी सांगितले की, हा व्हेरिएंट नवीन प्रकारचा असला तरी त्याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात. हे समजून घेण्यासाठी आमचे सर्व तज्ञांकडून यावर रिसर्च केलं जात आहे.

यूरोपमध्ये लहान मुलांना लवकरच कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यूरोपियन यूनिअनकडून ५ ते ११ वर्षांच्या मुलांना फायझर लस देण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. पहिल्यांदाचा यूरोपीयन मेडिसीन एजन्सीने लहान मुलांना COVID-19 व्हॅक्सिन देण्याची मंजूरी देण्यात आली आहे.