घरताज्या घडामोडीOmicron Variant: आफ्रिकेत ओमिक्रॉनचा हाहाकार; लॉकडाऊन केला लागू

Omicron Variant: आफ्रिकेत ओमिक्रॉनचा हाहाकार; लॉकडाऊन केला लागू

Subscribe

जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुन्हा एकदा काही देशांनी विमान सेवेवर बंदी घालण्यासारखे कडक निर्बंध लागू केले आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगाची डोके दुखी वाढवली आहे. या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर नियंत्रण मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत लेव्हल-१चा लॉकडाऊन केल्याचे समोर आले आहे.

दक्षिण आफ्रिका कसा लढतोय ओमिक्रॉनसोबत?

ओमिक्रॉनमुळे जगभरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात लोकं कोरोनाचे शिकार होत आहेत. जास्त करून लोकांना ओमिक्रॉनची लागण होत असल्यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने लेव्हन १चा लॉकडाऊन लागू केला आहे. बाजार पूर्णपणे बंद ठेवले आहेत, रस्ते सुनसान झाले आहेत आणि लोकं पुन्हा एकदा चारभिंतीत कैद झाले आहेत.

- Advertisement -

माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत एकूण पाच प्रकारे लॉकडाऊन लावले जातात. यामधील सर्वात कडक लॉकडाऊन पाचव्या श्रेणीतला असतो. अशात सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेत पहिल्या श्रेणीतला लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण जर परिस्थिती आणखीन चिंताजनक झाली तर सरकार आणखीन कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. सध्या लोकं लेव्हल-१चा लॉकडाऊन लावल्यामुळे नाराज झाले आहेत. व्यापारी म्हणतं आहेत की, त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. तसेच काही देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातल्यामुळे नुकसान होत आहे. यामध्ये अमेरिका, कॅनडा, ब्राझील, थायलँड, आस्ट्रेलिया, सिंगापूरसारख्या देशांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेतील उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे रुग्णालय रुग्णांनी भरले आहेत. त्यांच्यावर उपचार करणे आव्हानात्मक झाले आहे. परंतु अशा कठीण परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेला मदत करण्यासाठी भारत पुढे आला आहे. जीवनरक्षक औषधे, कोरोना किट, टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर भारताकडून दक्षिण आफ्रिकेला देण्यात येणार आहेत. याशिवाय भारत आपली स्वदेशी लस देखील दक्षिण आफ्रिकेत उपलब्ध करणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Omicronसोबत लढण्यासाठी SII बनवला कोविशिल्डचा बूस्टर डोस; DCGIकडे मंजूरीसाठी केली मागणी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -