घरताज्या घडामोडीसीरमला मोठा दणका ! दक्षिण आफ्रिकेने १० लाख डोस नाकारले

सीरमला मोठा दणका ! दक्षिण आफ्रिकेने १० लाख डोस नाकारले

Subscribe

दक्षिण आफ्रिकेने सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) ला covid-19 लसीचे १० लाख डोस देशात वापरण्यास नकार दिला आहे. सीरमकडून हे कोरोना लसीचे डोस फेब्रुवारी महिन्यात पाठवण्यात आले होते. द इकॉनॉमिक्स टाईम्सने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेका ची कोरोनाची लस तयार करणारी अशी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी मुख्य सप्लायर आहे. गेल्याच आठवड्यात सीरमकडून १० लाख डोस दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर काही आठवड्यातच आणखी ५ लाख डोस त्याठिकाणी पाठवण्यात येणार होते. जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेकाच्या कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. पण दक्षिण आफ्रिकेने ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेकाच्या लशीचा वापर करण्यात येणार नाही असे आठवडाभरापूर्वीच जाहीर केले होते. (South Africa refuse to use covid-19 vaccine, huge setback for serum institute of India)

दक्षिण आफ्रिकेतील लसीकरणाच्या मोहीमेत ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेकाचा वापर होणार नसल्याने हा एक मोठा निर्णय मानला जात आहे. एका क्लिनिकल ट्रायल दरम्यान या लसीमुळे कोरोनाच्या व्हेरीएंटमुळे उद्भवणाऱ्या आजारांवर ही लस कमी प्रभावी असल्याचे समोर आले होते. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाबाबतच्या लसीकरणात या लसीचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्या मुद्द्यामुळेच ही लस वापरणार नसल्याचे कळते. दक्षिण आफ्रिकेतील आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानुसार या कोरोना लसीची विक्री करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

दक्षिणेत कोरोना लसीकरणाच्या मोहीमेची सुरूवात होणे अपेक्षित आहे. त्यामुळेच क्लिनिकल ट्रायलमध्ये आलेल्या निकालानंतर आता सीरमची लस न वापरण्याचा दक्षिण आफ्रिकेने निर्णय घेतला आहे. संशोधकांनी प्रायोगिक तत्वावर जॉन्सन एंड जॉन्सनची लस मोहीमेसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -