Super variant : नव्या व्हेरीयंटमुळे WHO ने बोलावली तातडीची बैठक, UK ची फ्लाईट बंदी

South african corona variant

दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे छोट्या प्रमाणात सापडलेला कोरोना नवा स्ट्रेन वेगाने फैलाव करत असल्यानेच जागतिक आरोग्य संघटना (WHO) मार्फत आज शुक्रवारी एक तातडीची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते. या नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाविरोधी लसीची परिणामकारकता कमी होईल या अंदाजामुळेच डब्ल्यूएचओमार्फत तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील अशी माहिती आहे. सध्याच्या महामारीविरोधात लढताना जागतिक पातळीवर सुरू असलेल्या लसीकरणावरही याचा शक्य परिणाम पाहता आता डब्ल्यूएचओही कामाला लागली आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून युकेकडून फ्लाईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डब्ल्यूएचओकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, नव्या स्ट्रेनवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे नजीकच्या काळात हा कोरोनाचा व्हेरीएंट इंटरेस्टचा असेल किंवा कन्सर्नचा असेल हे लवकरच ठरेल असेही डब्ल्यूएचओकडून आजच्या तांत्रिक बैठकीनंतर स्पष्ट करण्यात येईल. आतापर्यंत झालेल्या चाचणीनुसार या व्हेरीयंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन असल्याचे आढळले आहे. त्यामुळेच येत्या काळात म्युटेशनवर आणखी अभ्यास करणे गरजेचे असल्याचे संघटनेचे मत आहे.

दक्षिण आफ्रिकेतील वैज्ञानिकांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, Covid-19 चा मनवा व्हेरीयंट देशात सापडला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन असून संसर्गाचा धोका वाडवण्यासाठी हा व्हेरीयंट कारणीभूत ठरू शकतो असेही स्पष्ट करण्यात आले. टुलिओ दे ऑलिवेरीया या दक्षिण आफ्रिकेतील विद्यापिठातील बायो इन्फॉर्मेटिक्सच्या प्राध्यापकाने स्पष्ट केले की, नव्याने सापडलेला कोरोनाचा B.1.1529 व्हेरीयंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन्स आहेत. पण याआधीच्या व्हेरीयंटच्या तुलनेत हा व्हेरीयंट नक्कीच खूपच वेगळा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणून दक्षिण आफ्रिकेतील वैज्ञानिकांनी ठरवल्यानुसार हा व्हेरीयंट ऑफ सिरीयस कन्सर्न असल्याचे दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री जो फाहला यांनी म्हटले आहे.

ड्रमॅटिकली डिफरंट

वैज्ञानिकांनी यआधीच स्पष्ट केल्यानुसार अनेक व्हेरीयंटच्या म्युटेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात फैलाव किंवा संक्रमणाची मोठी शक्यता असते. तसेच लसींचाही प्रभाव कमी होईल, असे या व्हेरीयंटचा गुणधर्म असतो. स्पाईक प्रोटिनमध्ये होणारे बदल हे सर्वात महत्वाचे ठरत आहेत. युकेच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेनेही स्पष्ट केले आहे की, कोरोना व्हायरसमधील स्पाईक प्रोटीन हा ड्रमॅटिकली डिफरंट म्हणजे अतिश वेगळा आहे. मूळ covid-19 व्हायरसपेक्षाही हा अतिशय वेगळा आहे. त्यामुळेच एजन्सीकडून हा व्हेरीयंट चाचणीअंतर्गत निरीक्षणासाठी ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

Uk ची फ्लाईट बंदी

युकेकडून दक्षिण आफ्रिकेतील सहा देशांवर आंतरराष्ट्रीय फ्लाईट्ससाठी बंदी घालण्यात आली आहे. तर दक्षिण आफ्रिके व्यतिरिक्त नामिबिया, लेसोथो, एस्वाटिनी, झिंम्बाब्वे, बोस्टवाना या देशांच्या फ्लाईट्सलाही बंदी घालण्यात आली आहे, असे युकेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.