Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona: पॉझिटिव्ह बातमी! दक्षिण आफ्रिकेचा घातक व्हेरियंट झाला गायब

Corona: पॉझिटिव्ह बातमी! दक्षिण आफ्रिकेचा घातक व्हेरियंट झाला गायब

Related Story

- Advertisement -

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्लीत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. तसेच कोरोना व्हायरसचा व्हेरियंट सुद्धा हळूहळू निष्क्रिय म्हणजेच नाहीसे होताना दिसत आहे. परंतु धोका टळला नाही आहे. कोरोना व्हायरसचा व्हेरियंट निष्क्रिय होत असले तरी त्याच्यात बदल होत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात दिल्लीत कोरोनाच्या तीन व्हेरियंटने अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्यामध्ये दोन दक्षिण आफ्रिका आणि एक ब्रिटनचा व्हेरियंट आहे, जे आता कमी दिसून येत आहेत. नव्या नमुन्यांच्या जिनोम सिक्वेसिंगमध्ये हे व्हेरियंट दिसत नाही आहेत.

दरम्यान दिल्लीतच जिनोम सिक्वेसिंग करणारी लॅब असूनही नमुन्यांचे आकडे खूप कमी आहेत. आतापर्यंत सुमारे दीड हजार नमुन्यांची जिनोम सिक्वेसिंग झाली आहे. तर हैदराबाद स्थित सीसीएमबी लॅबमध्ये यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यानंतर कोणतेही नवे नमुने पाठवले नाही आहेत.

- Advertisement -

नवी दिल्लीच्या नॅशन सेंटर फॉर डिसिज कंट्रोलच्या सुत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत मेपर्यंत ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या व्हेरियंट व्यतिरिक्त L452R आणि E484Q मिळून तयार झालेला B.1.617 व्हेरियंटचा सर्वात वेगाने फैलाव झाला होता. B.1.617 आणि युकेचा व्हेरियंट B.1.1.7 रुग्णांमध्ये जास्त आढळत होता. एवढेच नाही तर या दोन्ही व्हेरियंटमुळे लोकांमध्ये तयार झालेली अँटीबॉडी ५० टक्के कमी झाली होती. तर दक्षिण आफ्रिकेचा B.1.351 व्हेरियंट १० मेपासून गायब झाला आहे.

याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भविष्यात व्हायरसचे काय होईल याबाबत कोणालाही माहित नाही. परंतु वर्तमान स्थिती अशी आहे की, दिल्लीमध्ये ब्रिटनचा B.1.1.7 व्हेरियंट क्वचित दिसत आहे. तर B.1.617 व्हेरिंयट अजूनही दिल्लीत आहे. त्यामुळे पुढे याच्यामध्ये काय बदल होती याबाबत सांगता येणार नाही. दरम्यान यासंदर्भात माहित करून घेण्यासाठी जिनोम सिक्वेसिंग खूप महत्त्वाची आहे. परंतु राज्याकडून तितके नमुने जात नाही आहेत. आतापर्यंत दीड हजार नमुन्यांपैकी जिनोम सिक्वेसिंगमध्ये ६१२ मध्ये गंभीर व्हेरियंट आढळले आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण योजना स्वैर आणि असमंजस


- Advertisement -